आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Telly World: अखेर तो क्षण आला... श्री-जान्हवीने आईंना दिली होणाऱ्या बाळाची गोड बातमी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेच्या सोमवारच्या अर्थातच 13 जुलैच्या एपिसोडमध्ये गोखले कुटुंबातील सर्व आईंना एक आनंदाची बातमी मिळाली आहे. काय घडले या भागात जाणून घेऊयात सविस्तर...
श्री आपल्याला काय सांगणार आहे या कल्पनेने त्याच्या सर्व आई आतुर झाल्या होत्या. त्यांच्या चर्चांना उधाण आले होते. प्रत्येकीने आपापले अंदाज बांधले होते. तर्कवितर्क निघत होते. जान्हवीची तब्येत पाहून त्या सर्व जणी काळजीत पडल्या होत्या. श्री आणि जान्हवीने सर्व आईंना आपल्या बाळाबद्दल सगळं काही सांगण्याचा निर्णय अगोदरच घेतला होता. मात्र दोघेही योग्य वेळेची वाट बघत होते. अखेर हे दोघेही त्यांच्या होणा-या बाळाची गोड बातमी आपल्या आईंना देण्यासाठी त्यांच्याकडे आले. हे दोघेही काय सांगणार हे ऐकण्यासाठी सर्वजणी आतुर झाल्या होत्या.
अखेर जान्हवीने सर्व आयांना सुखद धक्का देत तुम्ही आजी होणार असल्याची गोड बातमी दिली. क्षणभर सर्वजणी स्तब्ध झाल्या. एवढी आनंदाची बातमी जान्हवीकडे असल्यानंतर आपण तिच्याशी किती दुष्टपणे वागलो, याची जाणीव श्रीच्या सर्व आईंना झाली. सर्वजणींना आपापल्या परीने तिची माफी मागितली. विशेषतः बेबी आत्याला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला. जान्हवीच्या पोटात गोखले कुटुंबाचा वंश वाढत असताना आपण कशापद्धतीने श्रीच्या दुस-या लग्नाचा घाट घातला होता, हे आठवून तिला पश्चाताप होत होता. तर दुसरीकडे तुझ्या पोटी आपल्या मुलाने जन्म घ्यावा, अशी इच्छा मोठ्या आईने तिच्याकडे व्यक्त केली. शरयूनेसुद्धा जान्हवीची माफी मागितली. तर श्रीची आई नर्मदाला जान्हवीच्या प्रेग्नेंसीची कुणकुण लागली होती. मात्र त्याकडे लक्ष न देता आपण तिच्याशी वाईट वागलो, याबद्दल तिलाही अपराधी वाटू लागले.
जान्हवीने मोठ्या मनाने आपल्या सर्व सासवांना माफ केले आणि येणा-या बाळाचे स्वागत करण्यास सांगितले. मध्यंतरीच्या काळात गोखले कुटुंबात आपापसात कितीही वाद झाले असले तरी नात्यातील ओढ मात्र कमी झाली नाही, हे दिसून आले. आता सर्वजणींना बाळाची ओढ आहे.
चला तर मग गोखल्यांच्या घरातील आनंदी आनंद बघण्यासाठी 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेचा येणारा भाग बघायला विसरु नका.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा, सोमवारच्या भागाची छोटीशी झलक...