आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest Track From Marathi Serial Julun Yeti Reshimgaathi

Telly World : \'जुळून येती...\'मध्ये अँकीमुळे टेंशनचे वातावरण, कशी सामोरे जाईल मेघना ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या मराठी मालिकांपैकी एक मालिका म्हणजे 'जुळून येती रेशीमगाठी'. सध्या या मालिकेत अँकी अर्थातच आदित्य नगरकर देसाई वाड्यात आल्याने देसाईंच्या घरात टेंशनचे वातावरण निर्माण झाले आहे. 4 जून अर्थात शनिवारी या मालिकेचा 511 वा भाग प्रसारित झाला. या एपिसोडमध्ये नेमकं काय घडलं, हे आम्ही तुम्हाला या पॅकेजमध्ये सांगत आहोत... चला तर मग जाणून घ्या 'जुळून येती रेशीमगाठी'चा लेटेस्ट ट्रॅक...
आदित्य-मेघनाच्या सांगण्यावरून नाना-माईने मेघनाच्या मैत्रिणीला म्हणजेच अंजलीला देसाईवाडीत राहण्याची परवानगी दिली. अंजलीने आपल्या मित्रालासुद्धा देसाईवाडीत भाडेतत्वावर घर उपलब्ध करून देण्याची विनंती नानांना केली. नानांनी अंजलीला तसे करण्यास होकार दिला. मात्र अंजलीचा हा मित्र अँकी म्हणजे मेघनाच्या पूर्वायुष्यातील प्रियकर आदित्य नगरकर असेल, याची कल्पना मेघना किंवा देसाई वाड्यातील कुणालाही नसते. देसाईवाडीत अँकीला पाहून मेघनाच्या चेहऱ्यावरचे रंग फिके पडतात. अँकीसुद्धा मेघनाला पाहून गडबडतो. अँकीच्या देसाई वाड्यातील मुक्कामाने मेघनाला दडपण आले आहे. त्यातच मेघना आणि आदित्यने अँकीला घरी जेवायचे आमंत्रण दिले आहे.
माईंना न विचारता मेघानाने अँकीला जेवायला बोलावल्याने त्या तिच्यावर रुसल्या आहेत. शिवाय अर्चू अर्थातच मेघनाची नंणदसुद्धा अँकीच्या येण्याने चांगलीच वैतागली आहे. मात्र नाना आणि आदित्यने मेघनाला साथ दिली आहे. त्यामुळे माई नानांवरसुद्धा रागवल्या आहेत.
तर दुसरीकडे सुरेशराव अर्थातच मेघनाच्या वडिलांनासुद्धा अँकी देसाई वाड्यात असल्याचे समजले आहे. त्यामुळे ते चांगलेच वैतागले आहे. देसाई वाड्यात जाऊन अँकीला घराबाहेर काढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. मात्र माधवी म्हणजेच त्यांच्या पत्नीने त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण ते काही ऐकूनच घ्यायला तयार नाहीत.
तर विजयानेसुद्धा नानांना हा जेवणाचा कार्यक्रम रद्द करता येईल का? असा प्रश्न विचारला. मात्र नानांनी तो व्हायलाच हवा, असे तिला सांगितले. नाना कधीच माईंच्या विरोधात जाऊन कुठलाही निर्णय घेत नाही, मग अँकीला जेवायला बोलावण्याचा घाट का घातला, याचे आश्चर्य तिला वाटत आहे.
आता खरंच अँकी खरंच देसाईंच्या घरी जेवायला येणार का? समजा आलाच तर माई, अर्चू आणि विजया त्याला कसे सामोरे जातील? नाना, आदित्य आणि मेघना ही परिस्थिती कशी हाताळणार? हे सोमवारच्या म्हणजेच आजच्या भागात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा, शनिवारच्या एपिसोडची क्षणचित्रं...