आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Laxmi Pujan In Nanda Saukhya Bhare,Niel Swanandi\'s Romantic Laxmi Pujan

PHOTOS:नील-स्वानंदीचं Romantic लक्ष्मीपूजन, ललिताची भीती पडली पथ्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लालची ललिताने क्षिरसागरांनी तिला काही काळासाठी म्हणून ठेवायला दिलेले सगळेच्या सगळे दिड कोटी खर्च करून टाकलेत. आणि आता लक्ष्मीपूजनाला क्षिरसागर ललिताच्या घरी ते पैसे घ्यायला खरं तर येणार आहेत. त्यामूळे आता ललिताची चांगलीच गोची झालीय. तिने आसरा शोधलाय तो देशपांडेच्या घरचा.
ललिताच्या भूमिकेतल्या सुहास परांजपे म्हणतात, “ललिताचा तात्पुरता युक्तीवाद हा आहे, की जर मीच लक्ष्मीपूजनाला क्षिरसागरांना सापडले नाही, तर ते पैसे कोणाकडनं घेतील. त्यामुळे ललिता खरं तर नील आणि नव-यासह सध्या घाबरून देशपांडेच्या घरी आलेली आहे. पण नेहमीच खोटं बोलणारी ललिता स्वानंदीच्या घरी येऊन खोटं सांगते, की, जी स्वानंदीच्या काकूची दिडशे किलो लाडवाची ऑर्डर कँसल झाली. ती मी घ्यायला आली आहे. बरं एवढंच खोटं बोलेल तर ती ललिता कसली. जेव्हा लक्ष्मीपूजनाला वहिनींचा फोन येतो, की आता संध्याकाळी तरी पूजेसाठी घरी ये. तर ती फोनवरून त्यांना खोटं कारण सांगते, की लग्नाचा मुहूर्त काढायला गेले होते तेव्हा गुरूजींनी सांगितलंय, की यंदाचं लक्ष्मीपूजन आम्हां तिघांसाठी त्या घरात धार्जिण नसल्याने मी आता देशपांडेंकडेच लक्ष्मीपूजन करणार आहे. ”
ललिताच्या ह्या निर्णयाचा फायदा ललिताला तर झालाच. पण नील आणि स्वानंदीला झाला हे, मालिकेच्या सेटवर गेल्यावर स्पष्ट दिसतं होतं. अख्खा दिवस नील आणि स्वानंदीने एकत्र काढला. स्वानंदी रांगोळी काढताना नील तिच्या शेजारी बसून होता. मस्तीत स्वानंदीने नीलच्या चेह-याला रंग लावला. आणि ते नेमकं घरात शिरताना ललिताने पाहिलंच.
स्वानंदी म्हणते, “सण म्हटला की, उत्साह असतोच. त्यात काकूची ऑर्डर वच्छीमावशी आणि ललिताबाईंनी घेतल्याने आता घरच्यांना थोडं हायसं वाटलंय. त्यामूळे आता टेन्शन गेलंय. त्यात नील घरी आलाय, आणि नील तर स्वानंदीची पाठ काही सोडणं शक्य नाही. स्वानंदी रांगोळी काढताना, हातात रंग धरून, नील तिच्यासोबत सतत होता. त्यामूळे रांगोळीच्यावेळी नील-स्वानंदीच्या प्रेमाचे रंगही मालिकेत दिसणार आहेत.”
(फोटो - प्रदिप चव्हाण)
पुढील स्लाइडमध्ये वाचा, स्वानंदी-नीलमधल्या रोमँसमूळे ललिताची काय झाली Reaction