आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Rare Photos: लक्ष्मीकांत बेर्डेंच्या मुलाचे उपनय संस्काराचे हे फोटोज यापूर्वी कधी पाहिलेत का तुम्ही!!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः 'ती सध्या काय करतेय' म्हणत मराठी चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल ठेवणारा अभिनेता म्हणजे अभिनय बेर्डे. पदार्पणातील चित्रपटातूनच अभिनयने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. उत्कृष्ट अभिनयाच्या बळावर अभिनय बेर्डे लांबचा पल्ला गाठणार हे त्याने दाखवून दिले आहे. आता लवकरच तो सचिन पिळगांवकर दिग्दर्शित 'अशी ही आशिकी' या चित्रपटातून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. 
 
आज अभिनयचा वाढदिवस असून त्याने वयाची 20 वर्षे पूर्ण केली आहेत. 3 नोव्हेंबर 1997 रोजी लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांच्या घरी अभिनयचा जन्म झाला. मुंबईतील मिठीबाई कॉलेजमध्ये तो शिकतोय.  आज अभिनयच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही त्याच्या फॅन्सना त्याची बालपणीची खास छायाचित्रे दाखवत आहोत. ही छायाचित्रे अभिनयच्या उपनय संस्काराची आहेत. नरसोबाची वाडी येथे त्याच्यावर उपनय संस्कार पार पडले होते. या छायाचित्रांमध्ये अभिनय अतिशय क्यूट दिसतोय. सोबतच त्याची धाकटी बहीण स्वानंदीदेखील त्याच्यासोबत दिसतेय. इंटरनेटवर ही छायाचित्रे उपलब्ध आहेत. 
 
चला  तर मग पाहुयात, अभिनयच्या उपनय संस्काराची ही निवडक छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...