आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Laxmikant Berde\'s Birthday Special : Meet There Children Abhinay And Swanandi

B\'day: एकाच दिवशी असतो लक्ष्मीकांत आणि त्याच्या मुलाचा वाढदिवस, भेटा \'लक्षा\'च्या मुलांना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगी स्वानंदी आणि मुलगा अभिनयसोबत प्रिया बेर्डे, इनसेटमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे - Divya Marathi
मुलगी स्वानंदी आणि मुलगा अभिनयसोबत प्रिया बेर्डे, इनसेटमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे

महाराष्ट्राचे लाडके अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आज वाढदिवस आहे. ते आज आपल्यात असते तर त्यांनी वयाची 61 वर्षे पूर्ण केली असती. 3 नोव्हेंबर 1954 रोजी जन्मलेल्या या हरहुन्नरी अभिनेत्याने रंगभूमी, मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी छाप पाडली. आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून नेहमीच ते आपल्याला हसवत राहणार आहेत.
लक्ष्मीकांत यांच्या खासगी आयुष्याविषयी त्यांच्या चाहत्यांना फार कमी ठाऊक आहे. लक्ष्मीकांत यांचे पहिले लग्न रुही बेर्डेंसोबत झाले होते. अभिनेत्री प्रिया बेर्डेंसोबत त्यांनी दुसरे लग्न केले होते. प्रिया आणि लक्ष्मीकांत यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. अभिनय हे मुलाचे तर स्वानंदी हे त्यांच्या मुलीचे नाव आहे.
एकाच दिवशी असतो लक्ष्मीकांत आणि अभिनयचा वाढदिवस
लक्ष्मीकांत आणि त्यांचा थोरला मुलगा अभिनयचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे 3 नोव्हेंबरला असतो. अभिनयचा जन्म भाऊबीजेचा तर लक्ष्मीकांत यांचा जन्म लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाला होता. एका मुलाखतीत अभिनयने वाढदिवसाच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले होते, ''माझा जन्म भाऊबीजेचा आहे आणि तारखेने माझा वाढदिवस 3 नोव्हेंबर आहे. पप्पा असताना आम्ही खूप मोठी पार्टी करायचो. कारण पप्पांचा जन्म लक्ष्मीपूजनाचा, तर माझा भाऊबीजेचा. आमच्या दोघांचे "बर्थ डे' थाटामाटात साजरे व्हायचे. आता आम्ही पप्पांना खूप मिस करतो."
प्रिया बेर्डे म्हणतात, ''समंजस मुले असल्यामुळे मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते''
लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन झाले तेव्हा अभिनय सात वर्षांचा तर स्वानंदी फक्त चार वर्षांची होती. आज अभिनय 17 तर स्वानंदी 14 वर्षांची आहे. दोघेही आपले शालेय शिक्षण पूर्ण करत आहेत. प्रिया बेर्डे यांनी आपल्या दोन्ही मुलांविषयी एका मुलाखतीत सांगितले होते, ''अभिनय आपल्या बहिणीची एखाद्या समंजस आणि थोरल्या भावासारखीच काळजी घेत असतो. विशेष म्हणजे स्वानंदीही त्याची काळजी घेते. दोघांचं आता एकमेकांशी असलेलं 'बाँडिंग' इतकं जबरदस्त आहे, की कधी कधी मलाही थक्क व्हायला होतं. या दोघांसारखी समंजस मुलं असल्यामुळे मी स्वत:लाच खूप भाग्यवान समजते.''
पुढे वाचा, आईवडिलांचा अभिनयाचा वारसा जपणार अभिनय...