आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LaxmiPoojan In Daily Soap Honar Sun Mi Hya Gharachi

Photos: श्री-जान्हवीच्या घरी होतंय लक्ष्मीपूजन, वाचा, जान्हवीची कोणती सासू आहे Shopaholic

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोखलेंच्या घरी नरकचतुदर्शीला अभ्यंगस्नानावेळीच श्रीला अमेरिकेहून फोन येतो. आणि श्री आता दिवाळीनंतर अमेरिकेला आठवड्याभरासाठी निघणार आहे. पण श्री अमेरिकेला जाणार म्हणून जान्हवी खट्टू झालेली नाही. उलट तिने लक्ष्मीपूजनाची सर्व तयारी उत्साहात केलीय.
तेजश्री प्रधान जान्हवीच्या ह्या स्वभावाचं वैशिष्ठ्य सांगताना म्हणते, “हेच तर जान्हवीचे वैशिष्ठ्य आहे, ज्यामूळे ती लोकांना आवडते. ती प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीकोणातून पाहते. श्री चाललाय म्हणून ती रागवली नाहीये, तर दिवाळीच्या पहिल्या दिवाशीच ही गोड बातमी आलीय, त्यामूळे ती खूश आहे. खरं तर, तिच्या सहाही सासू तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. तिला नमस्कार करायलाही वाकू देत नाहीत. पण जान्हवी आवडीने घरात सणाच्या दिवशी सहभागी होते. तशी ती लक्ष्मीपूजनाला सूध्दा दिसणार आहे.”
थोड्याचवेळात श्री-जान्हवीचं लक्ष्मीपूजन सुरू झालं. श्री पूजा करत होता, त्याच्याशेजारी बसलेली जान्हवी त्याला पूजेत मदत करत होती. तर आईआजी त्याला पूजा कशी करावी, ते सांगत होत्या. पूजा झाल्यावर शशांक म्हणाला, “ गोखलेंच्या घरी प्रत्येक सण हा त्याच्या वैशिष्ठ्यांसकट साजरा होतो. सणाच्या निमीत्ताने घरात उत्साहाचं वातावरण असतं. आणि काहीतरी संदेशही मालिकेतून दिला जातो."
जान्हवीच्या चारही सासू मागे पूजेसाठी बसल्या होत्या. पण आता त्या चौघींनाही घरच्या दिवाळीचेही वेध लागले होते.
श्रीची आई म्हणजेच सुहिता थत्ते सांगतात, “दिवाळीच्या वेळी सुट्टी मिळते. तेव्हा जरा आरामही करता येतो, आणि घरच्यांसोबत थोडा वेळही मिळतो. मी फराळ करत नाही. पण माझ्या मुलीला आणि नव-याला काही ना काही रेसिपीज ट्राय करायला आवडतात. मग आमचं सगळं कुटूंब दिवाळीच्या दिवशी एकत्र मिळून स्वयंपाक करतं. दिवाळीच्या निमीत्ताने माझे परदेशात राहणारे भाऊही येतात. वर्षांतून एकदा आमंच दिवाळी निमीत्ताने फॅमिली गेटटूगेदर होतं. मला फटाके बिलकूल उडवायला आवडतं नाही. त्या धूराचे, त्या कांठळ्या बसणा-या आवाजाचं लोकांना का आकर्षण आहे, ते मला आजतागायत कळलेलं नाही. मला तो पैशांचा अपव्यय पटतं नाही.”
सरूमावशीच्या भूमिकेतली अभिनेत्री स्मिता सरवदे म्हणते, “मला रांगोळी काढायला खूप आवडते. त्यामूळे मी रोज नव-नवी रांगोळी आमच्या दारात काढते. मला बारा भाऊ असल्याने माझी भाऊबीज दणक्यात होते. मला गिफ्ट्स घ्यायला तर आवडतातच. शिवाय मला शॉपिंग करायला तर प्रचंड आवडतं, ते ही दिवाळीच्या निमीत्ताने होतंच. फक्त फराळ बनवायला वेळच मिळत नाही. माझ्या माहेरी कुत्रा आहे. त्याला फटाक्यांचा खूप त्रास होतो. आणि मला पहिल्यापासूनच फटाके वाजवायला बिलकुल आवडतं नाहीत. आणि गेल्या चार-पाच वर्षात फटाके वाजवण्याचंही प्रमाण खूप कमी व्हायला लागलंय, ह्याचा आनंद आहे.”
(फोटो - प्रदिप चव्हाण)
पुढील स्लाइडमध्ये वाचा, जान्हवीच्या Shopaholic सासूविषयी