आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2016मध्ये हे मराठी सिनेमे घालणार धूमाकूळ, रिलीजसाठी सज्ज आहेत हे Movies

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2015 हे वर्षे मराठी सिनेसृष्टीसाठी कलाटणी देणारे ठरले, असे म्हणता येईल. या वर्षभरात अनेक वेगवेगळ्या जॉनरने सिनेमे रिलीज झालेत. काही सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळेच स्थान निर्माण केले. 2015 हे वर्ष सरल असून 2016चा सूर्य उगवला आहे. नवीन वर्षाची सर्वांनी धूमधडाक्यात सुरुवातही केली आहे. तसेच, 2016मध्ये कोण-कोणते मराठी सिनेमे रिलीज होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पहिल्याच तीत-चार महिन्यात तब्बल 25 विविध धाटणीचे मराठी सिनेमे रिलीज होत आहेत.
2015 यावर्षात 'कोर्ट', 'दगडी चाळ', 'कट्यार', 'ख्वाडा', 'किल्ला', 'बायोस्कोप', 'मितवा', 'बाजी' 'देऊळबंद', 'मुंबई-पुणे-मुंबई 2', 'डबल सीट', 'शटर', 'नागरिक' यांसह अनेक मराठी सिनेमांनी रुपेरी पडदा गाजवला.
'नटसम्राट' या सिनेमाने वर्षांची धमाकेदार सुरुवात झाली आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरत आहेत. अलीकडेच, नागराज मंजुळेच्या 'सैराट' सिनेमाचे एक गाणे लोकांना वेड लावत आहे. त्यामुळे या सिनेमाचाही उत्सूकता वाढली आहे. असे अनेक मराठी सिनेमे आहेत, जे यंदा रिलीज होत आहेत. त्यामध्ये, 'गुरु', 'फ्रेंड्स', 'शासन', 'लालबागची राणी', 'सदाचारी', फुंतरू', 'माऊली', 'युथ', 'पोश्टर गर्ल' यांसह अनेक सिनेमे सामील आहेत. हे मराठी सिनेमांनी सर्वांना उत्सूकता लागली आहे. यात काही सिनेमा जानेवारी, फेब्रुवारी तर काही मार्चमध्ये रिलीज होणार आहेत.
आज या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला 2016 या वर्षांत कोण-कोणते मराठी सिनेमे रिलीज होणार आहेत, ते सांगत आहोत. जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिका करा...