आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lokmanya Ek Yugpurush First Look In Shaniwarwada

ढोल ताशांच्या गजरात शनिवारवाड्यात अवतरले 'लोकमान्य टिळक’, पाहा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
"'स्वराज्य' हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" अशी गर्जना करून ब्रिटीशांच्या जुलमी सत्तेला हादरवून सोडणारे भारतीय असंतोषाचे जनक आणि समाजसुधारक लोकमान्य टिळक. लोकमान्य यांच्या आयुष्यावर आधारित 'लोकमान्य- एक युगपुरूष' हा सिनेमा 2 जानेवारीला राज्यभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या पहिल्या प्रदर्शनाचे दर्शन पुण्यातील लोकांना 9 डिसेंबर रोजी घडले.
पुण्यातील शनिवारवाड्यात आयोजित या कार्यक्रमात प्रेक्षकांची गर्दी ओसंडून वाहत होती. रणशिंग, ढोल ताशे, गणेश वंदना, छत्रपती शिवरायांचा जयजयकार, शाहिरांचे पोवाडे या सर्व गोष्टींनी तयार झालेले रोमांचकारी वातावरण आणि अशा वातावरणात त्यांच्या आगमनासाठीची शिगेला पोचलेली लोकांची उत्सुकता दिसून येत होती. अशा रोमांचकारी वातावरणात लोकमान्याची भूमिका साकारलेला सुबोध भावे रंगमंचावर अवतरतो आणि लोकांनाचे डोळे तृप्त होतात.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी ललकारी देतात सुबोध भावे लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेत मंचावर आला. त्यांच्या या रुपाने भारावलेल्या जनसमुदायाने लोकमान्य टिळकांचा विजय असो या घोषणांनी आसमंत दणाणून सोडला.
स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील असे हे दृश्य 9 डिसेंबर रोजी पुणेकरांनी पुन्हा एकदा अनुभवले.
यावेळी ‘लोकमान्य- एक युगपुरूष’ या सिनेमाच्या पहिल्या रुपाचे प्रदर्शनाच्या दर्शन अशा भव्य दिव्य कार्यक्रमातून लोकांनी झाले. अभिनेता सुबोध भावे या सिनेमात लोकमान्य यांची भूमिका वठवत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लोकमान्य- एक युगपुरुष सिनेमाच्या पहिल्या भव्य दिव्य प्रदर्शनाची छायाचित्रे...