आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Subodh Bhave Starer Lokmanya Ek Yugpurush Trailor Released

सुबोध भावेच्या \'लोकमान्य एक युगपुरुष\' सिनेमाचा Trailor रिलीज, पाहा खास झलक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावर आधारित 'लोकमान्य-एक युगपुरुष' या आगामी सिनेमाचा ट्रेलर अलीकडेच रिलीज करण्यात आला आहे. पुढील वर्षी 2 जानेवारीला रिलीज होणारा हा सिनेमा ओम राऊत यांनी दिग्दर्शित केला आहे. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक (बाळ गंगाधर टिळक) यांचा जीवनपट पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर साकारला गेला आहे. या ऐतिहासिक सिनेमात सुबोध भावे प्रमुख भूमिकेत आहे.
या सिनेमासाठी लोकमान्यांचे पणतू दीपक टिळक यांच्याकडून आवश्यक ती परवानगी घेण्यात आली आहे. 'दिल्ली सफारी' हा अॅनिमेशनपट आणि 'कल हो ना हो' या सिनेमाचे दिग्दर्शन करणारे अडवाणी टिळकांवरील सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच ऐतिहासिक सिनेमाची निर्मिती करत आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने ओम राऊत प्रथमच दिग्दर्शन क्षेत्रात प्रवेश करणार आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने शंकर-एहसान-लॉय हे प्रसिद्ध संगीतकार त्रिकुटाने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे.
व्हिडिओवर क्लिक करा आणि पाहा 'लोकमान्य एक युगपुरुष'चा ट्रेलर...