आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Wedding Albulm : 'लव्ह लग्न लोचा'ची सौम्या ख-या आयुष्यात अडकली लग्नाच्या बेडीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झी युवावर वाहिनीवर सध्या गाजत असलेल्या 'लव्ह लग्न लोचा' या मालिकेतील सौम्या म्हणजेच अभिनेत्री अक्षया गुरव 23 मे रोजी लग्नाच्या बेडीत अडकली. DOP भूषण वाणी यांच्याशी ती विवाहबद्ध झाली. मुंबईमध्ये अक्षया आणि भूषणचा विवाहसोहळा पार पडला. महाराष्ट्रीय पद्धतीने दोघे विवाहबद्ध झाले. गेल्या काही महिन्यांपासून अक्षया आणि भूषण हे रिलेशनशीपमध्ये होते.
 
असे जुळले भूषणसोबत नाते... 
अक्षयाला लग्नाबद्दल विचारले असता ती म्हणाली, "एका मित्राच्या घरी झालेली ओळख ते त्याच्यात आयुष्यभराचा जोडीदार मिळणे, हा प्रवास फारच सुंदर होता. भूषणचा काळजी घेण्याचा स्वभाव व माझ्यासाठी असलेला त्याचा वेडेपणा आणि मुख्य म्हणजे एकाच इंडस्ट्रीमध्ये असून सुद्धा त्याला माझ्या कामाचे महत्व  समजून घेणे आणि सपोर्ट करणे मला मनापासून भावले." 
 
सोशल मीडियावरुन दिली चाहत्यांना न्यूज... 
अक्षयाने नुकतेच तिचे मेहंदीचे, हळदीचे आणि लग्नाचे फोटो सध्या तिच्या सोशल मीडियावर अपलोड केले तेव्हा तिच्या फॅन्सना तिच्या लग्नाची बातमी कळली. 
 
अक्षयाविषयी... 
अक्षया गुरव मराठी इंडस्ट्रीतील एक गुणी अभिनेत्री मराठी सिनेमा "फेकम फाक" मध्ये तिने काम केलं होत. त्याच बरोबर छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमधून ती झळकली होती. सध्या ती 'लव्ह लग्न लोचा' या मालिकेमधे सौम्या ही भूमिका करत आहे. सध्या सुरु असलेल्या मालिकेच्या ट्रॅकमध्ये तिने सुमितला अल्टिमेटम दिला असून सर्व मित्रांना सोडून तिच्याबरोबर मुंबई बाहेर यायला सांगत आहे. 

भूषणविषयी... 
भूषणने रिलायन्स जिओ, सेव्हिलॉन, फ्लिपकार्ट या आणि अशा अनेक जाहिरातींचे dop म्हणून काम सांभाळले आहे .

पुढील स्लाईड्सवर बघा, अक्षया आणि भूषणच्या लग्नाच्या अल्बममधील खास क्षण... 
 
बातम्या आणखी आहेत...