आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Love Story Of Marathi Actor Prasad Oak And Manjiri Oak

LOVE STORY : प्रसाद-मंजिरीने केले होते लव्ह मॅरेज, लग्नानंतरही सुरु होता घरच्यांचा विरोध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी मंजिरीसोबत प्रसाद ओक - Divya Marathi
पत्नी मंजिरीसोबत प्रसाद ओक

एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी सिनेसृष्टीतील कलाकार आपल्या खासगी आयुष्याविषयी फारसे बोलणे पसंत करत नाहीत. प्रोफेशनल आणि खासगी आयुष्य हे कलाकार वेगळे ठेवतात. त्यामुळे या सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याविषयी त्यांच्या चाहत्यांना फारसे ठाऊक नसते. अशाच काही कलाकारांच्या लव्ह स्टोरीविषयी आम्ही तुम्हाला सांगत आहोत. Love Life या सीरिजच्या माध्यमातून मराठीतील प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक आणि त्याची पत्नी मंजिरी ओक यांच्या लव्ह स्टोरीविषयी जाऊन घेता येणारेय. हे पण वाचा - अनिल कपूरची झक्कास लव्ह स्टोरी...
आतापर्यंत 70 ते 75 सिनेमे, 80 ते 85 मालिका आणि 25 नाटकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे प्रसाद ओक. ‘अवघाचि संसार’ मालिकेतली खलनायकी वळणाची भूमिकाही असो वा ‘नांदी’ नाटकातली स्त्री भूमिका, प्रसादने सर्वच भूमिकांना योग्य न्याय दिला. इतकेच कशाला ‘सारेगमप’ स्पर्धेतून गायक म्हणूनही प्रसादने आपली वेगळी छाप उमटवली आहे. प्रसादने आपल्या अभिनयाच्या बळावर स्वतःची मोठी फॅन फॉलोईंग निर्माण केली आहे. स्वभावाने शांत असलेल्या प्रसादने मंजिरीची निवड आपल्या जोडीदाराच्या रुपात केली आहे. 7 जानेवारी 1998 रोजी प्रसाद आणि मंजिरीचे लग्न झाले. या दोघांचे हे लव्ह मॅरेज आहे. हे पण वाचा - गौतमी कपूर आणि राम कपूर यांची लव्ह स्टोरी कशी सुरु झाली होती...
कशी झाली होती पहिली भेट...
प्रसादचा भाऊ हा मंजिरीचा मित्र. मंजिरीलासुद्धा अभिनयाची आवड असल्याने सदानंदच्या माध्यमातून ती प्रसादच्या अभिनयाच्या कार्यशाळेमध्ये सहभागी झाली होती. साधारण तीन महिने ही कार्यशाळा होती. त्यावेळी प्रसाद एका नाटकासाठी मंजिरीला शिकवत होता. त्याच काळात हे दोघे एकमेकांच्या जवळ आहे. गंमत म्हणजे या दोघांमध्ये कुणीही कुणाला प्रपोज केले नव्हते. मात्र आयुष्यभराचे जोडीदार होऊ शकतो, हे दोघांना उमगले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. हे पण वाचा - आशुतोष राणासोबत रेणुका शहाणेने थाटला दुसरा संसार
पुढे वाचा, घरच्यांचा होता लग्नाला कडाडून विरोध...