एन्टरटेन्मेंट डेस्कः 'तुझ्यासाठीच यश, तुझ्यामुळेच यश म्हणूनच श्रेय आणि श्रेयस तुझेच..' वाक्य फिल्मी वाटेल, पण त्यांची सगळी कहाणीच फुल टू फिल्मी... आम्ही बोलतोय ते अभिनेता श्रेयस तळपदे आणि त्याची पत्नी दिप्ती तळपदे यांच्याविषयी...
एका मध्यमवर्गीय संयुक्त कुटुंबाने संस्कार दिले, क्रिकेटच्या पिचने खिलाडूवृत्ती दिली, रंगमंचाने जिवंतपणा दिला, छोट्या-मोठ्या पडद्याने, मोठे मोठे स्वप्न दिले आणि ही स्वप्ने वास्तवात आणण्यासाठी ईश्वराने दीप्ती दिली. श्रेयस तळपदेच्या पत्नी दीप्तीविषयीच्या भावना. श्रेयस अॅक्टर, तर ती सायकॉलॉजिस्ट. याचा साधेपण, तर तिची वैचारिक स्पष्टता, त्यामुळे दोघेही एक दुसर्यापेक्षा फार वेगळे, तरीही 'मेड फॉर इच अदर'. तिने संघर्षाच्या काळात दिलेली साथ, प्रगतीच्या काळात दाखवलेला विश्वास, हा त्यांच्या नात्याचा कणा.. आमच्या LOVE LIFE या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला श्रेयस आणि दिप्तीविषयी बरंच काही सांगत आहोत. श्रेयस आणि दिप्तीची लव्ह स्टोरी खूप रंजक आहे. जाणून घेऊयात दीप्ती कशी झाली श्रेयसची...
दिल मे बंजी घंटी..
'आभाळमाया' या मालिकेमुळे श्रेयसला ओळख मिळाली होती. त्यामुळे त्याला विनायक गणेश महाविद्यालयातील स्नेहसंमेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून बोलावण्यात आले. अतिथी म्हणून बोलावण्याची ही त्याची पहिलीच वेळ होती. त्या वेळी जीएस पदावर होती दीप्ती देशमुख. दीप्तीने फोनवरून श्रेयसला निमंत्रण दिले. त्यानंतर 2-3 वेळा फोनवर बोलणे झाले. 21 डिसेंबरच्या कार्यक्रमाआधी दीप्ती मैत्रिणींसह श्रेयसला प्रत्यक्ष निमंत्रण देण्यासाठी गेल्या. श्रेयसने दीप्तीला पाहिले. दीप्तीने श्रेयसला पाहिले आणि 'दिल मे घंटी बजी'चा अनुभव आला. श्रेयसचे 'गोलमाल' सुरूच राहिल्याने या स्ट्रगल स्टोरीत प्रेमाचा अँगल मिळाला.
आणि प्रपोज केले..
21 डिसेंबर रोजी कार्यक्रमाच्या निमित्ताने गप्पा झाल्या. लव्ह अॅट फस्ट साइटमुळे श्रेयसची नजर दीप्तीवरून हटत नव्हती. कार्यक्रम संपला, टाटा-बायबाय झाले; पण चारच दिवसांत श्रेयसने 26 डिसेंबरला 'मुझसे शादी करोगी टाइप' डायरेक्ट दिल से प्रपोज केले. दीप्तीसाठी हा धक्काच होता. शिवाय ती पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जाणार होती. त्यामुळे तिने नकार दिला; पण 'जब किसी को पुरी शिद्दत से चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलानेकी कोशिश मे जुट जाती है', 'ओम शांती ओम' चित्रपटातील हा डायलॉग, श्रेयसच्या बाबतीच आधीच घडला. दीप्तीचे अमेरिकेला जाणे रद्द झाले. पुन्हा बोलणे, भेटणे सुरू झाले. अडीच वर्षांनतर 'हसीना मान गयी.'
आणि शुभमंगल..
सायकॉलॉजीचे शिक्षण झाल्यानंतर दीप्तीच्या घरी सांगण्यात आले. हे कळताच खूप काही आढेवेढे न घेता लग्नाची तारीख काढण्यात आली. दीप्तीच्या मावशीचे मंगल कार्यालय आहे. लग्न तेथेच करायचे अशी मावशीची आधीपासूनची इच्छा होती; पण फक्त 31 डिसेंबरची तारीख शिल्लक होती. त्यामुळे 2005 च्या पूर्वसंध्येला दोघे विवाह बंधनात अडकले.
पुढे वाचा, श्रेयस म्हणतो, नाही तर निर्णय चुकला असता...