Love Story Of Marathi Couple Sachin And Supriya Pilgaonkar
Love Story : स्वतःच्याच लग्नात तब्बल 3 तास उशीरा पोहोचले होते सचिन, अशी मिळाली \'नवरी\'
5 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी सिने इंडस्ट्रीतील परफेक्ट कपल म्हणून सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांना ओळखले जाते. 'नवरी मिळे नव-याला' या सिनेमाच्या सेटवर दोघांची भेट झाली आणि ही रिल लाईफ जोडी रिअल लाईफमध्ये एकत्र आली. आज (16 ऑगस्ट) सुप्रिया यांचा वाढदिवस असून त्यांनी वयाची 50 वर्षे पूर्ण केली आहेत. तर उद्या म्हणजेच 17 ऑगस्ट रोजी सचिन वयाची 60 वर्षे पूर्ण करणार आहेत. या दोघांच्या वयात दहा वर्षांचे अंतर आहे. 17 ऑगस्ट 1957 ही सचिनजींची तर 16 ऑगस्ट 1967 ही सुप्रिया यांची जन्मतारीख आहे. या दाम्पत्याला श्रिया ही एकुलती एक लेक आहे. तीन महिने कैदेत होती ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, बाळासाहेब ठाकरेंमुळे झाली होती सुटका
सचिन आणि सुप्रिया 'नवरी मिळे नव-याला' या सिनेमाच्या सेटवर प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न केले, हे तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र सुप्रिया यांना हा सिनेमा कसा मिळाला, दोघांच्या लग्नात काय घडले होते, ज्यामुळे सुप्रिया वैतागल्या होत्या, हे सर्वकाही आज आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून सांगत आहोत. खरं सासरं सुरेख करण्यासाठी मृणालचा 'अस्सं सासर..'ला रामराम, ही अभिनेत्री साकारणार 'जुई'