आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्राच्या बहिणीशी थाटला आहे रवी जाधव यांनी संसार, लग्नासाठी पत्नीच्या वडिलांनी ठेवली होती अशी अट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी चित्रपटसृष्टीतील एक उमदा निर्माता, दिग्दर्शक आणि आता अभिनेते असलेले रवी जाधव आज त्यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहेत. रवी जाधव यांनी सोशल मीडीयावर, त्यांच्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. रवी यांनी त्यांच्या लग्नाचा आणि इतर काही फोटो शेअर करत कॅप्शन दिले आहे की, Our anniversary is not just a celebration of our wedding day. It is the celebration of every day of being married to an awesome person like you. Happy Anniversary Meghana Jadhav ❤️. मित्राच्या बहिणीशी केले आहे रवी जाधव यांनी लग्न...

 

रवी जाधव यांच्या पत्नी मेघना जाधव या रवी यांच्या मित्राची बहीण. मित्राला भेटायच्या निमित्ताने ते मेघनाला पाहायला तिच्या घरी जात असत. असे करता करता दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले आणि  14 फेब्रुवारीला रवी जाधव यांनी मेघना यांना प्रपोज केले होते. त्यानंतर एक महिन्याने मेघना यांनी होकार कळवला आणि त्यांच्या अफेअरला सुरुवात झाली. 

 

मेघना यांच्या वडिलांनी ठेवली होती ही अट...
मेघनाच्या वडिलांना रवी-मेघना यांच्या अफेअरबद्दल कळाले तेव्हा त्यांनी रवी जाधव यांच्यासमोर मेघनाशी लग्न करण्यासाठी स्वतःचे घर घेण्याची अट ठेवली. ही अट मान्य करत रवी जाधव यांनी काटकसर करत स्वतःचे घर उभे केले आणि मग मेघनाशी लग्न केले. 

 

पत्नी मेघना यांनी केले आहे टीचरचे काम..
रवी जाधव यांच्या पत्नी मेघना यांनी टीचरचे काम केले आहे. त्यावेळी त्यांना 800 रुपये पगार होता तर रवी जाधव यांना 4000 ते 4500 एवढा पगार होता. रवी जाधव यांना जॉब करत राहणे पटत नव्हते आणि त्यांनी जॉब सोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मेघना यांनी घराची जबाबदारी स्वीकारली. आज मेघना या रवी जाधव यांच्या प्रोडक्शन कंपनीमध्ये फिल्म प्रोडक्शन, मीडियाची जबाबदारी सांभाळतात. आज रवी जाधव यांना दोन मुले आहेत.

 

काही वर्षांनी गावात राहून जाण्याची इच्छा..

रवी जाधव यांनी काही वर्षानंतर त्यांच्या गावात जाऊन राहण्याची इच्छा व्यक्त केली. पैशांच्या नादी लागून फार जास्त कमाई करण्यात रवी आणि त्यांच्या पत्नीलाही आवड नाही असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, रवी जाधव यांच्या फॅमिलीचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...