आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिलीज झाला धोनीवर आधारित ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’चा मराठी ट्रेलर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: सध्या बॉलिवूडमध्ये कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनी याच्यावर आधारित ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमाच्या ट्रेलरची चर्चा रंगली आहे. हा सिनेमा हिंदीसोबतच भारतातील विविध भाषांमध्येही डब केला जाणार आहे. त्यात मराठीचाही समावेश आहे. म्हणजे हा सिनेमा प्रेक्षकांना मराठीत बघायला मिळणार आहे. नुकताच या सिनेमाचा मराठी ट्रेलर रिलीज करण्यात आला. रितेश देशमुखच्या हस्ते हा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय.

धोनीच्या मुख्य भूमिकेत अभिनेता सुशांत सिंह राजपूत असून त्याच्या कामाबद्दल आतापासूनच त्याचं कौतुक केलं जातं. धोनीचा एका तिकीट कलेक्टरपासून ते क्रिकेटरपर्यंतचा प्रवास या सिनेमात बघायला मिळणार आहे. त्याच्या आयुष्यातील अनेक प्रायव्हेट गोष्टींचाही खुलासा या सिनेमातून होणार आहे.धोनीवर आधारित या सिनेमाच्या ट्रेलरने रेकॉर्ड तयार केला होता. 36 तासात या सिनेमाचा ट्रेलर 1 कोटी लोकांनी बघितला होता. हा रेकॉर्ड आहे. अजूनही या सिनेमाचा ट्रेलर पुन्हा पुन्हा बघितला जात आहे. आता तर प्रादेशिक भाषांमध्येही तो आल्याने पुन्हा आपल्या भाषेत बघितला जाणार आहे.
सुशांतसोबतच अनुपम खेर, भूमिका चावला यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत. येत्या 30 सप्टेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’चा मराठी ट्रेलर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...