आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मधु इथे अन् चंद्र तिथे' थिएटरमध्ये नव्हे, टीव्हीवर रिलीज होणारा पहिला सिनेमा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी सिनेमाला अभिजात विनोदाची मोठी परंपरा लाभली आहे. मराठी चित्रपटांच्या गौरवशाली इतिहासात विनोदी सिनेमाचं योगदान नेहमीच मोलाचं ठरलं आहे. विनोदाची ही परंपरा जपत 'मधु इथे अन चंद्र तिथे' हा सिनेमा येत्या 12 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘चित्रपंढरी’ या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती ‘झी टॉकीज’ व रत्नकांत जगताप यांनी केली असून दिग्दर्शक संजय झणकर आहेत. हा पहिलाच सिनेमा आहे, जो थिएटरमध्ये नव्हे तर टीव्हीवर रिलीज केला जाणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नव्या वाटा धुंडाळत अनेक वेगवेगळे प्रयोग व नव्या कल्पना पुढे येऊ लागल्या आहेत. अशीच अनोखी कल्पना घेऊन ‘झी टॉकीज’ रसिकांसाठी 'मधु इथे अन चंद्र तिथे' हा मराठी सिनेमा घेऊन आली आहे. झी टॉकीज वाहिनीने पुढाकार घेऊन व्यावसायिक सिनेमा निर्मित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
'मधु इथे अन चंद्र तिथे' या चित्रपटातून एक रंजक कथा आपल्यासमोर उलगडणार आहे. प्रत्येक शहराची स्वत:ची एक खासियत असते. हीच खासियत घेऊन कोल्हापूर व पुणे हे एकत्र आल्यावर उडणाऱ्या धमाल कथेची मेजवानी म्हणजे 'मधु इथे अन चंद्र तिथे' हा सिनेमा. धमाल, मस्ती घडवत प्रेक्षकांना विनोदाची मेजवानी देणार आहे. आनंद इंगळे, भाऊ कदम, किशोर चौघुले, शैला काणेकर, विशाखा सुभेदार, संजय मोहिते, ऋतुराज फडके, शाश्वती पिंपळीकर अशी विनोदवीरांची फौज यात आहे.
या चित्रपटाविषयी बोलताना ‘झी टॉकीज’चे बिझनेस हेड बवेश जानवलेकर म्हणाले की, वेगळं काहीतरी करण्याचा ‘झी टॉकीज’चा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. आजच्या घडीला छोटा पडदा हे प्रभावी माध्यम असल्याने या माध्यमातून मराठी सिनेमासाठी वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न ‘झी टॉकीज’ करणार आहे.
मधु इथे अन चंद्र तिथे 12 जूनला दुपारी 12 वा आणि संध्याकाळी 6 वा प्रेक्षकांना झी टॉकीजवर पहाता येणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'मधु इथे अन चंद्र तिथे'च्या कलाकारांचे 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवरील फोटो....
बातम्या आणखी आहेत...