आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी करतेय मराठी सिनेसृष्टीत पदार्पण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
अजय देवगण, रितेश देशमुख, प्रियांका चोप्रा, आणि जॉन अब्राहमनंतर बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित-नेने आता मराठी सिनेनिर्मितीत पदार्पण करतेय. तिच्या कलाकृतीच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वप्ननील जयकर सांभाळणार आहे. माधुरी तिच्या आर. एन. एम. मुव्हिंग पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड या बॅनरमध्ये पहिल्यावहिल्या मराठी चित्रपटाची निर्मिती करणारेय. अद्याप तिच्या या मराठी चित्रपटाचे शीर्षक आणि कलाकारांची नावे फायनल झालेली नाहीत. योगेश विनायक जोशी हे या चित्रपटाचे लेखक आहेत. या वर्षाअखेर शूटिंगला सुरुवात होणार असल्याचे समजते. पण माधुरी स्वतः या सिनेमात दिसेल की नाही याबाबत मात्र उत्सुकता कायम आहे. 
 
लवकरच चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञांची निवड करण्याचं काम पूर्ण होईल. नितीन वैद्य या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असतील. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल. एकीकडे परदेशात माधुरीवर मालिका बनत असताना, दुसरीकडे ती स्वतः मराठीत येण्यासाठी सज्ज झाल्यानं तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.
 
स्वप्ननील जयकर यांनी यापूर्वी 'तेंडुलकर आऊट' हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. तर छोट्या पडद्यावरील 'चुकभूल द्यावी घ्यावी' या मालिकेचेसुद्धा ते दिग्दर्शक होते. 
 
बातम्या आणखी आहेत...