आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धकधक गर्ल माधुरीला घायाळ केलं ‘कट्यार’ने, वाचा तिची फिल्म पाहिल्यानंतरची प्रतिक्रिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धकधक गर्ल माधुरी दिक्षीत गेली २५ वर्ष तिच्या चाहत्यांना आपल्या अदांनी घायाळ करतेय. ती नुसती हसली तरी ‘कलिजा खलास झाला’, अशी तिच्या चाहत्यांची अवस्था होते. पण ह्या धकधक गर्लच्या काळजात मात्र नुकतीच ‘कट्यार’ घुसलीय.
‘कट्यार काळजात घुसली’ हा सिनेमा पाहून भारावलेली माधुरी म्हणते, “मी लहानपणी ‘कट्यार काळजात घुसली’ हे नाटक पाहिलं होतं. त्याच्या धुसर आठवणी मनात ठेवूनच मी ‘कट्यार’ चित्रपट पाहायला गेले. आणि मन मोहवून टाकणारा अनुभव पाहायला मिळाला. ह्यात शंकर महादेवनचा सहज वावर आपल्या लक्षात राहतोच. पंडितजींच्या भूमिकेत शंकर खूप स्वीट वाटतात. त्यांनी भूमिकेला योग्य न्याय दिलाय. ‘घेई छंद मकरंद’ ऐकणं तर खूप रिफ्रेशिंग होतं. ही फिल्म म्हणजे कानसेनांसाठी एक छान पर्वणी आहे.”
गेली अनेक वर्ष माधुरीच्या चाहत्यांना तिला मराठी सिनेमा करताना पाहण्याची इच्छा आहे. ती सूध्दा मराठी फिल्म करायला उत्सुक आहे. ती म्हणते, “मी मराठी असल्याने मराठी चित्रपटात काम कधी करशील हा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. मला मराठी फिल्ममध्ये काम करायची खूप इच्छा आहेच. पण तशी कोणतीही फिल्म अद्याप माझ्यापर्यंत आलेली नाही. हे मात्र खरं की, सध्या आपला मराठी सिनेमा खूप बदलतो. त्याच्यातले बदल हे सुखावह आहेत. ”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, माधुरीच्या मनमोहक अदा
बातम्या आणखी आहेत...