आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MADHYAMVARG The Middle Class Marathi Movie Release On 12th December

\'मध्यमवर्ग\'च्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर दिसणार सामान्य जनतेचा लढा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धनाढ्य आणि गरीब वर्गात न मोडणारा, संख्येने मोठा असलेला वर्ग म्हणजे 'मध्यमवर्ग'. महागाई, अर्थिक टंचाई, भ्रष्टाचार या सर्व गोष्टींची पहिली झळ या वर्गालाच सोसावी लागते. अशा या मध्यमवर्गीयाने विचार केला तर एकीच्या जोरावर समाजाची विस्कटलेली घडी सुरळीत होऊ शकते. याच कथा विषयावर भाष्य करणारा 'मध्यमवर्ग- The Middle Class' हा मराठी सिनेमा येत्या 12 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये झळकणार आहे.
निर्मात्या लक्ष्मी बाबाजी आंजेर्लेकर आणि संजय गोपाळ छाब्रिया निर्मित या सिनेमाचे लेखक-दिग्दर्शिक हॅरी फर्नांडिस आहेत.
हिंदी आणि भोजपूरी सुपरस्टार रवि किशन पहिल्यांदाच या मराठी सिनेमामधून मुख्य भूमिका साकारत आहे. रवि किशनसोबत मराठी अभिनेता सिध्दार्थ जाधव पोलिस अधिका-याच्या दमदार भूमिकेत दिसणार आहे. अनंत जोग, नयन आपटे, सुजाता जोशी, कश्मिरा कुलकर्णी, हेमांगी काझ, किशोर नांदलस्कर, वसंत आंजर्लेकर, रमेश वाणी, अनिल गवस, अॅलन फर्नांडिस, तन्वी मेहता, राज खत्री या कलाकारांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.
सिनेमाची पटकथा, संवाद हॅरी फर्नांडिस यांनी लिहिले आहेत. बाबासाहेब सौदागर, सावता गवळी, हॅरी फर्नांडिस यांनी मध्यमवर्गचे गीत लिहिले आहेत. सिनेमातील 'कोंबड्याची बाग' हे गाणे बप्पी लहरी आणि कल्पना यांनी स्वरबध्द केले आहे. तसेच, 'परिवार' हे गाणे स्वप्निल बांदोडकर, पी. गणेश, नयना आपटे, अनुपमा शर्मा, वैशाली डे, सुप्रिया पाठक यांनी गायले आहे. 'नऊवारी साडी' या गाण्याला वैशाली सामंतने आवाज दिला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिनेमातील काही सीन्स...