आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?\'मध्ये \'आर्ची-परशा\'च्या झक्कास परफॉर्मन्सची ट्रीट, बघा अवॉर्ड शोचे PIX

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबई - झी टॉकीजचा 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' हा अवॉर्ड सोहळा सोमवारी (20 फेब्रुवारी)  मुंबईतील हयात रिजेन्सी हॉटेलमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. या अवॉर्ड शोचे यंदाचे हे आठवे वर्ष आहे. या सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. अभिनेते महेश मांजरेकर, नागराज मंजुळे, छाया कदम, जयवंत वाडकर, श्रेयस तळपदे, अमेय वाघ, संस्कृती बालगुडे, केतकी माटेगांवकर, अश्विनी भावे यांच्यासह मराठीतील अनेक दिग्गज या सोहळ्याला उपस्थित होते. 

यंदाच्या या अवॉर्ड शोचे आकर्षण ठरले 'सैराट' फेम आर्ची आणि परशा अर्थातच अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरु. या दोघांनीही दमदार परफॉर्मन्स सादर करुन सोहळ्याला चारचाँद लावले. शिवाय पुरस्कारही आपल्या नावी केलेत.  

या पॅकेजमधून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2016' सोहळ्यातील खास क्षणचित्रे.  
 
कसा रंगला हा अवॉर्ड सोहळा बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...  
बातम्या आणखी आहेत...