आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX :‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’वर 'सैराट'ची मोहोर, आकाश-रिंकू ठरले फेव्हरेट अॅक्टर-अॅक्ट्रेस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा आणि कलाकार, रसिकांचे ज्या पुरस्कार सोहळयाकडे विशेष लक्ष असते असा पुरस्कार सोहळा म्हणजे महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? या पुरस्कार सोहळ्यात आपल्या कलाकृतीला कौतुकाची थाप मिळावी, असं सगळ्याचं कलाकारांना वाटतं. यंदाच्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षक पसंतीची मोहोर ‘सैराट’ चित्रपटावर उमटली असून सर्वोत्कृष्ट अभिनेता व अभिनेत्री पुरस्काराचे मानकरी आकाश ठोसर व रिंकू राजगुरू ठरले. या पुरस्कार सोहळ्याचे प्रक्षेपण रविवार 19 मार्चला सायंकाळी सात वाजता झी टॅाकीजवर होणार आहे.

 
रसिकांनी नोंदवलेल्या सर्वाधिक मतांनुसार इतर विभागांमध्ये फेव्हरेट दिग्दर्शक म्हणून सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. सैराट मधील ‘झिंगाट’ व ‘आताच बया का बावरलं’ या गाण्यांसाठी अज –अतुल व श्रेया घोषाल यांना गौरवण्यात आलं. फेव्हरेट नवोदित अभिनेत्याचा पुरस्कार  म्हणून आकाश ठोसर व नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार रिंकू राजगुरूने पटकावला. 'फेव्हरेट स्टाईल आयकॉन' म्हणून आकाश ठोसरला पुरस्कार देण्यात आला. ‘फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर’ पुरस्कार अभिनेत्री रिंकू राजगुरूने पटकाविला तर सहाय्यक अभिनेत्री पुरस्कारासाठी छाया कदम तसेच सहाय्यक अभिनेता पुरस्कारासाठी तानाजी गालगुंडे ह्यांना प्रेक्षकांच्या पसंतीची दाद मिळाली. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी अभिनेता सचिन पिळगांवकर यांना गौरवण्यात आले तर सर्वोत्कृष्ट गीताचा बहुमान ‘झिंगाट’ने पटकावला.
 
पुढे बघा, या सोहळ्याचे New Photos... 
बातम्या आणखी आहेत...