आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG! आकाश ठोसरचे अफेअर सुरु... महेश मांजरेकरांनी घेतली शाळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी चित्रपटसृष्टीत महेश मांजरेकरांचा दरारा सर्वश्रुत  आहे. चित्रपटसृष्टीतील कोणतीच गोष्ट त्यांच्यापासून लपून राहत नाही. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रत्येकाची इत्थंभूत माहिती मांजरेकरांकडे असते. सैराट फेम आकाश ठोसरच्या सुरु असलेल्या अफेअरची कानोकान खबर लागताच मांजरेकरांनी आकाशची चांगलीच शाळा घेतली. आकाशच्या वाढत्या फोनकॅाल्सची खबरबात घेत ‘सध्या तो काय करतो’ याचं गुपित मांजरेकरांनी उलगडलं आहे. आकाशचं अफेअर कोणासोबत आणि कुठे सुरु आहे? हे जाणून घेण्यासाठी झी टॅाकीजवर रविवार 19 मार्चला प्रसारित होणाऱ्या ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ 2017 या पुरस्कार सोहळ्याची तुम्हाला वाट पाहावी लागेल. दरवर्षी ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ या पुरस्कार सोहळ्यात महेश मांजरेकर कलाकारांची चांगलीच शाळा घेतात, किंबहुना हा पुरस्कार सोहळा महेश मांजरेकरांच्या स्पूफमुळेचं अधिक रंगतदार होतो. यंदाही हा सोहळा अनेक आकर्षक कलाविष्कारांनी चांगलाच रंगला.  
 
20 फेब्रुवारी रोजी मुंबईत रंगला सोहळा... 
झी टॉकीजचा 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' हा अवॉर्ड सोहळा 20 फेब्रुवारी रोजी मुंबईतील हयात रिजेन्सी हॉटेलमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. या अवॉर्ड शोचे यंदाचे हे आठवे वर्ष आहे. या सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. अभिनेते महेश मांजरेकर, नागराज मंजुळे, छाया कदम, जयवंत वाडकर, श्रेयस तळपदे, अमेय वाघ, संस्कृती बालगुडे, केतकी माटेगांवकर, अश्विनी भावे यांच्यासह मराठीतील अनेक दिग्गज या सोहळ्याला उपस्थित होते. यंदाच्या या अवॉर्ड शोचे आकर्षण ठरले 'सैराट' फेम आर्ची आणि परशा अर्थातच अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरु. या दोघांनीही दमदार परफॉर्मन्स सादर करुन सोहळ्याला चारचाँद लावले. शिवाय पुरस्कारही आपल्या नावी केलेत. सर्वाधिक पुरस्कार सैराट या सिनेमाला मिळाले. 

पुढील स्लाईड्सवर बघा 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2016' सोहळ्यातील आकाश ठोसरची खास छायाचित्रे..  
बातम्या आणखी आहेत...