आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मल्टिस्टारर ‘शिवाजी पार्क मुंबई 28’च्या शूटिंगला सुरुवात, संतोष जुवेकरने शेअर केले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता संतोष जुवेकरने मराठीतील दिग्गज अभिनेत्यांसोबतचा हा फोटो त्याच्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. - Divya Marathi
अभिनेता संतोष जुवेकरने मराठीतील दिग्गज अभिनेत्यांसोबतचा हा फोटो त्याच्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे.

मराठी चित्रपटसुर्ष्टीतील दिग्गज कलाकारानं एकत्र आणून दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर हे एक संवेदनशील कलाकृती लवकरच आपल्या सामोरे घेऊन येत आहे . ‘शिवाजी पार्क मुंबई २८’ हे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव असून यानिमित्ताने प्रथमच दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, अशोक सराफ, सतीश आळेकर, शिवाजी साटम हे दिग्गज कलावंत एकत्र काम करताना दिसणार आहेत. त्याच बरोबर शरद पोंक्षे, उदय टिकेकर, सविता मालपेकर, सुहास जोशी आणि भारती आचरेकर हे ज्येष्ठ कलावंत असून संतोष जुवेकर, सुशांत शेलार, दिप्ती लेले, मंजिरी फडणीस हे आजच्या पिढीतील तरुण कलाकारही या चित्रपटात झळकणार आहेत. 
 
नुकतीच या चित्रपटाच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. अभिनेता संतोष जुवेकरने शूटिंग सेटवरील दोन फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन  दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. संतोषने शेअर केलेल्या फोटोजमध्ये त्याच्यासोबत अशोक सराफ, महेश मांजरेकर, शिवाजी साटम, विक्रम गोखले दिसत आहेत.
 
संतोषने फोटोज शेअर करुन लिहिले, "महेश दादाच्या नविन सिनेमात काम करण्याची संधी मिळालीये आणि नुसती काम करण्याचीच संधी नाही तर कुणा रथी महारथींन बरोबर काम करण्याची संधी मिळालीये बघा. विक्रम गोखले, अशोक सराफ, सतिश आळेकर, शिवाजी साठम, दिलीप प्रभावळकर (ते आज शुटिंगला न्हवते म्हणून ते फोटोत नाहीत, nxt time त्यांच्या सोबत) Thank you very much महेश दादा."
 
महेश वामन मांजरेकर प्रस्तुत व गौरी पिक्चर्स निर्मित ‘शिवाजी पार्क मुंबई २८’ या सिनेमाची निर्मिती दिलीपदादा साहेबराव यादव व सिद्धार्थ केवलचंद जैन करीत असून मंगेश रामचंद्र जगताप, शंकर रामेश्वर मिटकरी या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. 

पुढे बघा, संतोष जुवेकरने शेअर केलेला आणखी एक फोटो... 
बातम्या आणखी आहेत...