आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नटसम्राट'मध्ये महेश मांजरेकर यांच्या पत्नीची महत्वपूर्ण भूमिका?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः महेश मांजरेकर, रिमा लागू)
मुंबई: काही दिवसापूर्वी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नाशिक येथे कुसुमाग्रजांच्या ‘नटसम्राट’ या नाटकावर आधारित चित्रपटाची घोषणा केली. या घोषणेनंतर यात अप्पा बेलवलकरांच्या पत्नीची भूमिका रिमा लागू साकारणार असल्याचे बोलले जात होते, मात्र त्यांनी या चित्रपटातून एक्झिट घेतली आहे. कारण ही भूमिका स्वीकारण्यापूर्वी भूमिकेची जितकी लांबी सांगण्यात आली होती ती प्रत्यक्षात खूपच कमी असल्याचे रिमा लागू यांचे म्हणणे आहे.

मात्र रिमा लागू यांच्यानंतर आता 'नटसम्राट' चित्रपटच दिग्दर्शित करत असलेले महेश मांजरेकर यांची पत्नी मेधा मांजरेकर ही भूमिका साकारणार असल्याचे कळते. अद्याप यावर शिक्कामोर्तब झालेला नाहीये. परंतु शक्यता वर्तवली जात आहे, की अप्पा बेलवलकरांच्या पत्नीच्या भूमिकेत मेधा मांजरेकर दिसणार आहेत.

‘नटसम्राट’ या चित्रपटात नेहा पेंडसे, सुनील बर्वे, विक्रम गोखले, नाना पाटेकर यांच्या भूमिका आहेत. सुनील बर्वेचे या चित्रपटाचे नुकतेच पहिले शेड्यूल पूर्ण झाले आहे.
रिमा लागू यांची जागा कोणती अभिनेत्री घेणार याचा शोध महेश मांजरेकर यांना होता. मात्र हा शोध संपला असल्याचे दिसून येत आहे. त्यांची पत्नी या सिनेमात खरंच काम करणार का, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
बऱ्याच वर्षांपासून हा चित्रपट करण्याचा प्रयत्न मांजरेकर करत होते. आता हा योग जुळून आला असताना व नाना पाटेकर, विक्रम गोखले यांच्यासारखे दिग्गज कलाकार यांचा दमदार अभिनय या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.