आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Makar Sankranti Special: Film Poshter Girl Team\'s Kite Flying And Tilgul Celebration

मकरसंक्रांती celebration:‘पोश्टर गर्ल’च्या कलाकारांची पतंगबाजी, तिळगुळ, आणि मस्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मकरसंक्रांतीच्या सणाला बिल्डींगच्या गच्चीवर उभे राहून ‘पोश्टर गर्ल’चे दिग्दर्शक समीर पाटील, फिल्मची हिरोइन सोनाली कुलकर्णी आणि हिरो हेमंत ढोमेला पतंग उडवण्याचे धडे देत होते. एरवी फिल्मच्या सेटवर असताना अभिनयाच्या बारकाव्यांविषयी जेवढे समीर आग्रही असतात, तेवढेच एकाग्रतेने ते पतंगाची कन्नी, मांजा ह्यासगळ्याविषयी दोन्ही अभिनेत्यांना प्रशिक्षण देत होते. एकिक़डे समीर पाटील गुरूजींचा क्लास रंगला होता, आणि दूसरीकडे गप्पा आणि मस्तींनाही उत आला होता. कधी पतंग हेमंतच्या हातात आणि ढील द्यायला सोनाली उभी तर कधी हेमंत ढील देतोय, आणि सोनाली पतंग उडवण्याच्या प्रयत्नात रंगून गेलेली दिसत होती.
‘कोण जास्त चांगलं पतंग उडवतंय’ असं समीर गुरूजींना विचारल्यावर त्यांच्याऐवजी त्यांचे शिष्यच बोलू लागले. हेमंत म्हणाला, ‘सोनाली, कारण तिने भल्याभल्यांचे पतंग कापलेत. हा तर फक्त कागदी पतंग आहे.’ तर सोनाली हेमंतची पाठ थोपटत म्हणाली,’ नाही हेमंतच, कारण त्याच्या करीयरच्या पतंगाची छान भरारी घेणं चालू आहे, कागदी पतंग ही सध्या तो तसाच उडवतोय.’ तेवढ्यात सुसाट वा-यामूळे सोनालीच्या हातातला पतंगच उडून गेला. मग दूस-या पतंगाला कन्नीने बांधत ती बोलू लागली.
“खरं तर, मी आणि हेमंतने ह्याअगोदर कधीही पतंग उडवलेला नाही. पण आज छान वारा सुटलाय. जास्त दूरवर आकाशात पतंग न उडवता शकून म्हणून अगदी पाच-दहा मिनीट पतंग उडवून आनंद लूटण्याचा प्रयत्न आहे, एवढंच. नाही तर, एरवी, मैदानी खेळापेक्षा मला नेहमीच डान्समध्ये रस होता. त्यात पतंग उडवल्यावर त्याच्या धारदार दोरीमूळे कोणाला इजा होऊ शकते. ह्या गोष्टीच्या विचाराने मी पतंग न उडवणंच पसंत केलं. बाइकस्वारांचे होणारे अपघात, पक्षांचा पतंगामूळे होणारा मृत्यू, लहानग्यांच्या जीवाला होणारा धोका, अशा अनेक बातम्या आपण नेहमीच ऐकतो. त्यामूळे पतंग उडवणे मला आवडत नाही.”
हेमंतने सोनालीच्या ह्या मुद्यालाच अधोरेखीत करत तो म्हणाला, “पतंगाच्या दोरीने हात कापला जाईल, किंवा त्या धारदार दोरीमुळे कोणाला इतरांनाही त्रास होण्याची शक्यता असल्याने वडिलधा-यांनी काळजीने पतंग उडवण्यापासून लहानपणी परवृत्तच केलं. पण तरीही आपल्याला सगळ्या गोष्टी जमायलाच हव्यात ह्या हट्टापायी, मी एकदा पतंग उडवण्याचा असफल प्रयत्न केला होता. नवख्या माणसाला पतंग उडवण्याची टेक्निक पटकन आत्मसात होत नाही. आणि तेच माझं झालं, त्यामुळे आपोआपच पतंग उडवण्यातला रस संपला. त्यानंतर पतंग उडवण्याचे तोटे, त्यामुळे माणसांना आणि पक्षांना होणारा त्रास ह्यामुळे पतंग उडवणे चांगले नसल्याचं आपसुकच उमजलं. “
पुढील स्लाइडमध्ये, वाचा, कोणी जास्त तिळगुळाचे लाडू खाल्ले