आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘नागपूर अधिवेशन’च्या निमित्ताने मकरंद अनासपुरे सरकारी सेवेत रुजू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या अस्सल ग्रामीण लहेजाने अनेक भूमिका गाजविणारे अभिनेते मकरंद अनासपुरे ‘नागपूर अधिवेशन एक सहल..’ या मराठी चित्रपटातून सरकारी अधिकाऱ्याच्या मिश्कील भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येताहेत. नागपूरमध्ये दरवर्षी भरणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर पहिल्यांदाच या सिनेमातून भाष्य करण्यात आले आहे. निलेश जळमकर लिखित – दिग्दर्शित ही एक ‘पॉलिटीकल सटायर’ फिल्म असून अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या अनेक गमतीजमती प्रथमच या निमित्ताने मोठ्या पडद्यावर उलगडणार आहेत. ‘विदर्भ पिक्चर्स’ प्रस्तुत, ‘नागपूर अधिवेशन’ या चित्रपटाची निर्मिती अनिल केशवराव जळमकर यांनी केली आहे.
‘नागपूर अधिवेशन’ चित्रपटात शासकीय यंत्रणेच्या दबावाखाली असलेल्या सर्वसामान्य सरकारी कर्मचाऱ्याची व्यक्तिरेखा मकरंद यांनी साकारली आहे. संजय साळुंखे असे या व्यक्तिरेखेचे नाव असून अधिवेशनाच्या काळात या कर्मचाऱ्याला वरिष्ठांच्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. कामावरच्या जबाबदाऱ्या व घरच्या कौटुंबिक समस्या अशा भिन्न ट्रॅक्सवर ही व्यक्तिरेखा खुलत असल्याने गमतीशीर असे संजय साळुंखे पात्र यानिमित्ताने आपल्याला पाहायला मिळणार आहे. अधिवेशनाच्या काळात मंत्र्यांच्या फर्मानामुळे कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडते. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही एक शिक्षाच असते तर मंत्र्यांसाठी मात्र अधिवेशन ही एक सहल असते, असा उपरोधिक चिमटा यात काढण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...