आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Makrand Deshpande Playing Daddy In Film Dagadi Chawl, Confirms The Actor

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मकरंद देशपांडे बनला ‘डॅडी’, म्हणतोय, ‘दगडी चाळी’तून गवळीमधला माणूस दाखवणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मकरंद देशपांडे बनला अरूण गवळी
एकेकाळी ‘दगडी चाळी’ची दहशत मुंबईवर आणि मुंबईच्या अंडरवल्डमध्ये होती. मोस्ट वॉन्टेड गँगस्टर ते राजकिय नेता असा अरूण गवळीचा प्रवास फिल्ममेकर्सना आकर्षित करणारा आहे. मध्यंतरी बॉलीवूडमध्ये अरूण गवळीवर फिल्म बनणार असल्याची हवा होती. अर्जुन रामपालने आपण ‘डॅडी’ची भूमिका करणार असल्याचेही स्वत:च सर्वांना कळवले होते.
बॉलीवूडने अरूण गवळींवर फिल्म बनवण्याच्या आधीच आता मराठीत ‘दगडी चाळी’वर फिल्म बनून तयार आहे.
मंगलमुर्ती फिल्म्स आणि साई पूजा फिल्म्स निर्मित आणि चंद्रकांत कानसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ’ ही फिल्म येत्या २ ऑक्टोबरला रिलीज होत आहे. चित्रपटाचा फस्ट लूक टिझरही नुकताच आउट झालेला आहे. आणि ह्यात डॅडीची भूमिका कोण करतंय, हे रिव्हील न करण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न दिसून येतोय.
मात्र प्रोमाच्या शेवटी ‘चुकीला माफी नाही’, असं बोलणारा आवाज हा अभिनेता मकरंद देशपांडेचाच असल्याचं स्पष्ट कळतंय. आणि त्यामुळे डॅडीची आयडेंटिटी निर्मात्यांना लपवता आली नाही आहे.
दगडी चाळमधल्या भूमिकेविषयी मकरंद देशपांडेला विचारले असता त्यांनी सांगितले, “ ही काही अरूण गवळीची बायोग्राफीकल फिल्म नाही. ह्यात अरूण गवळी आपल्याला भेटतो, पण त्याचप्रमाणे आपल्यासमोर एक कथा उलगडतं जाते. अरूण गवळीला माणूस म्हणून ह्या चित्रपटात दाखवण्यात आलंय.”
मकरंद देशपांडे आणि अरूण गवळीच्या उंचीमध्ये फरक आहे. त्याविषयी मकरंदने सांगितलं. “उंची ही तशी दुय्यम गोष्ट होती. अरूण गवळीचं व्यक्तिमत्व आणि स्टाइल जास्त महत्वाची होती. जेव्हा ही तुम्ही फिल्म पाहाल तेव्हा तुम्हांला ह्याविषयी जास्त उलगडा होऊ शकेल.”
मकरंद देशपांडेसोबतच चित्रपटात अंकुश चौधरी आणि पूजा सावंत ह्यांच्याशी मुख्य भूमिका आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, 'दगडी चाळ' चित्रपटाचा प्रोमो