आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानसी नाईकला वाटते लिफ्टची भीती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: सामान्य माणसांबरोबरच सेलिब्रिटींनाही कुठला ना कुठला फोबिया असतो. तेदेखील याला अपवाद नसतात. नुकत्यात एका तरुण अभिनेत्रीचा फोबिया दिव्य मराठीला लक्षात आला. ही तरुण अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. झाले असे, टाइमपास २चे म्युझिक लाँच नुकतेच मुंबईत विलेपार्ले येथील ऑर्किड इंटरनॅशनल या भव्य हॉटेलमध्ये पार पडले. कार्यक्रम होता सातव्या मजल्यावर अर्थात टेरेसवर. एरवी लावणी, आयटम साँगमधून खास तडका दाखवणारी मानसी या कार्यक्रमासाठी पोहोचली. तिला कार्यक्रम सातव्या मजल्यावर आहे हे सांगण्यात आले असता ती आपल्या सोबत यावे अशी विनंती तेथल्या वेटरला करु लागली. पण नियमानुसार वेटरना हो काही म्हणता येईना. तितक्यात या कार्यक्रमाला आणखी कुणीतरी जाणारे तिथे आले नि मानसीचा प्रश्नच सुटला. मानसीला लिफ्टची भीती वाटते हे सांगण्यास हा प्रसंग पुरेसा होता.