आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Xclusive : OMG मानसी नाईक होणार आई?.. वाचा, कशी बनली मानसी कुमारी माता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानसी नाईक
आपल्या फक्कड लावण्यांनी आणि दिलखेचक अदांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारी अभिनेत्री मानसी नाईक आता लवकरच आई होणार आहे. पण याचा अर्थ लग्नाअगोदर मानसीचा पाय घसरलाय, वगैरे मनात आणण्याच्या अगोदर हे पूढचं वाचा.
मानसी नाईक आई होणार आहे. पण एका चित्रपटासाठी. हॉरर थ्रिलर ‘दि शॅडो’मध्ये ती आईची भूमिका साकारणार आहे. ह्या बद्दल मानसी नाईक सांगते, “मी राम्या नावाची २० वर्षांची अमेरिकेत राहणारी तरूणी आहे. आणि अमेरिकेच्या कल्चरमध्ये वाढल्याने खूप स्वच्छंदी राहणीमान असलेली ही राम्या १३-१४ वर्षाची असतानाच आई बनते. २० वर्षांची असताना आपल्या मुलीसोबत ती आपल्या भारतातल्या जुन्या घरी येते. खरं तर ह्या घरात तिच्या आईच्या ब-याच आठवणी असतात. पण ह्या आठवणी जाग्या करायला गेलेल्या, भावूक राम्यासोबत अनेक सूपरनॅचरल गोष्टी होतात. त्या घरात खूप अतर्क्य घटना घडतात. पहिल्यांदाच अशी कथा मराठीत होतेय. त्यामूळे ही खूप इंटरेस्टिंग स्टोरी असणार आहे.”
मानसी पूढे म्हणते, "आजपर्यंत आपण हॉलीवूड आणि बॉलावूडमध्ये अनेक हॉरर फिल्म पाहिल्या आहेत. आणि आता त्याच तोडीची ही पहिली मराठी हॉरर स्टोरी येतं आहे. मला मोठ्याने कसं किंचाळावे ह्याचे ट्रेनिंग चक्क आमचे दिग्दर्शक रोहन सातघरे ह्यांनी दिले. मला स्वत:ला हॉरर स्टोरीजची खूप भीती वाटते. आणि आम्ही मुंबईबाहेर शुटिंग करत असलेला बंगलाही खूप एकांतात असल्याने भीतीच वाटायची. त्यामुळे कधीकधी तर मी चक्क खरोखरीच घाबरून किंचाळलीय.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कोण आहे चित्रपटात मानसी नाईकची मुलगी?