आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामंगेश बोरगांवकरने बनवली इको-फ्रेंडली गणेशमूर्ती
सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. पावसाने ओढ घेतलेली आहे. अशावेळी आता पर्यावरण संवर्धनाची नितांत आवश्यकता आहे. पूर्वी शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवून बाप्पाची प्रतिष्ठापना घरोघरी व्हायची. पण आता ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या’च गणेशमूर्ती बनवल्या जातात. म्हणूनच divyamarathi.comने पुढाकार घेऊन पून्हा एकदा शाडू मातीविषयी जनजागृती व्हावी म्हणून Eco-Friendly गणेशमूर्ती बनवण्याची मोहिम हाती घेतलीय.
ह्या मोहिमेत सामिल झालेल्या सेलिब्रिटींमध्ये आहे, गायक मंगेश बोरगांवकर. मंगेश बोरगांवकरचे बाप्पा हे आराध्य दैवत. लहानपणापासूनच त्याच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना होताना त्याने पाहिलीय. मात्र पहिल्यांदा त्याने गणपतीची मूर्ती आपल्या हाताने बनवण्याचा प्रयत्न केला. आणि गणपतीचं मनमोहक रूप आपल्या हाताने आकाराला आल्यावर त्याच्या डोळ्यात उमटलेला आनंद अवर्णनीयच होता.
मंगेश आपल्या अनुभवाबद्दल सांगतो, “ माझ्या घरी लातूरला बहूधा चार-पाच पिढ्यांपासून किंवा त्याही आधीपासून गणपतीची प्रतिष्ठापना होत असावी. लहानाचं मोठं होताना गणेशोत्सव आणि त्यातली पूजा, अथर्वशिर्ष, आराधना हा सूध्दा माझ्यावर झालेल्या संस्कारांचाच भाग होता. त्यामूळे बाप्पावर माझी असिम भक्ती. आजच्या भाषेत सांगायचे झाले, तर मी बाप्पाचा ‘फॅन’ आहे. पण बाप्पाची मूर्ती कधी आपण हाताने घडवू असं वाटलंच नव्हतं.”
मंगेश पूढे सांगतो, “मुंबईसारख्या ठिकाणी जिथे माती कशी असते, हे पाहायला मिळतं नाही. तिथे मी शाडू मातीला हात लावला आणि मातीचा सुगंध मला काही क्षणांसाठी लातूरला घेऊन गेला. गणपतीचे एक वैशिष्ठ्य आहे. तो तुम्ही वेगवेगळ्या आकारांमध्ये आणि रूपांमध्ये बनवू शकता. त्यामुळे आज मी माझा गणपती माझ्या मनात जसं त्याचं रूप होतं, तसा बनवला. त्याचं ते आखीव रेखीव रूप बनवताना, एक वेगळाच आनंद होत होता. आणि हे सगळं घडून आलं divyamarathi.com मूळे. आता गणेशमूर्ती बनवल्यावर वाटतंय, अरे, गणेशमूर्ती बनवण्यात किती छान सूख आहे. आणि हा बाप्पा तर आता मी घरी घेऊन जाईनंच. पण ह्यापूढे मी सूध्दा शाडू मातीच्याच गणेशमूर्ती घरी आणण्याचा प्रयत्न करेन. आणि लोकांनाही नक्कीच सांगेन की, शाडू मातीच्याच गणेशमूर्ती आणा. लातूरला तर नेहमीच पाण्याचे दुर्भिक्ष राहिलंय. त्यामूळे माझ्या शहराने जरी हा उपक्रम कटाक्षाने राबवला, तर त्याने निसर्गाचा –हास न व्हायला खूपच मदत होईल. हे एक निसर्गचक्र आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ”
(सर्व फोटो - प्रदिप चव्हाण)
पुढील स्लाइडमध्ये वाचा, मंगेशसाठी यंदाचा गणेशोत्सव का आहे खास?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.