आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिल्म इंडस्ट्रीतील मित्रांनी जल्लोषात साजरा केला अभिनेता मंगेश देसाईचा वाढदिवस, पाहा PIX

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रंगभूमीवर आणि अनेक मराठी सिनेमांमध्ये वेगवेगळ्या भूमिका करणारे अभिनेता मंगेश देसाई आपणा सर्वांना चांगलेच परिचीत आहेत. आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना हसवत ठेवणा-या या अभिनेत्याने 28 जून रोजी वयाची 43 वर्षे पूर्ण केली. मराठी फिल्म इंडस्ट्रीतील त्यांच्या मित्रांनी अर्थातच अभिनेता मकरंद अनासपुरे, भाऊ कदमसह अनेकांनी जल्लोषात त्यांचा वाढदिवस साजरा केला.
सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकवरसुद्धा त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. मंगेश यांनी फेसबुकवर आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्यांनी लिहिले, "काल ब-याच जणांना मला रिप्लाय करता आला नाही. तुमच्या शुभेच्छांसाठी आभारी आहे. तुमची दोस्ती अशीच राहू द्या. एक विनंती... माझा बायोस्कोप हा सिनेमा 17 जुलैला येतोय. तो बघून मला प्रतिक्रिया कळवा. शुभेच्छा मला आयुष्यात अजुन पुढे नेतील. पुन्हा एकदा थँक्स."
मंगेश यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर झाली आहेत. ही छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...