आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: बोल्ड अँड ब्युटीफूल आहे ही पुणेरी मुलगी, श्रेयस तळपदेसोबत म्हणतेय \'वाह ताज\'!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेता श्रेयस तळपदे स्टारर 'वाह ताज' हा सिनेमा आज बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. या सिनेमात हिंदीत स्वतःचे वेगळं स्थान निर्माण करणारी मराठमोळी मुलगी मंजिरी फडणीस श्रेयससोबत मेन लीडमध्ये आहे. अजित सिन्हा दिग्दर्शित या या हिंदी सिनेमात पहिल्यांदाच श्रेयस तळपदे आणि मंजिरी फडणीस हे दोन्ही मराठमोळे कलाकार एकत्र बघायला मिळणार आहेत. या दोघांच्याही या सिनेमात मराठीच भूमिका आहेत. श्रेयसच्या भूमिकेचे नाव तुकाराम असून त्याने ताज महालची जमीन त्याच्या आजोबाची असल्याचा दावा केला आहे आणि ही केस आता न्यायालयात गेली आहे. या घटनेने वरपासून खालपर्यंत सगळीकडे गोंधळ उडाला आहे.
शेतक-यांच्या प्रश्नांवर या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. सोबतच भ्रष्ट सरकार विरोधात आवाज उठवण्यात आला आहे. विनोदाच्या माध्यमातून या गंभीर प्रश्नावर भाष्य करण्यात आल्यामुळे आता या तुकारामाला त्याची जमीन मिळते का? यासाठी त्याला कसा विरोध होतो? ही जमीन खरंच त्याची आहे का? या प्रश्नांची उत्तरे घेण्यासाठी हा सिनेमाच बघावा लागणार आहे.
मराठी मुलगी स्थिरावली बॉलिवूडमध्ये...
अत्यंत गोड चेह-याच्या मंजिरीने 'जाने तू या जाने ना' या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. अलीकडेच ती कपिल शर्मासोबत किस किस को प्यार करूं या सिनेमात झळकली होती. मंजिरीने हिंदी, तेलगू, बंगाली, मल्याळम, कन्नड आणि तमिळ, मराठी भाषेत सिनेमे केले आहेत. मुळची पुण्यातील असली तरी वडील भारतीय लष्कराने असल्याने अनेक शहरांमध्ये तिचे बालपण आणि कॉलेज लाईफ गेले आहे. सध्या ती करिअरमुळे मुंबईत राहते.
मंजिरी टिपिकल मराठी मुलगी असून सिनेमात करिअर करेल असे तिला कधी वाटले नव्हते. तिच्या कुटुंबातही कुणी चित्रपटांमध्ये किंवा नाटकांत काम करीत नाही. असे असतानाही तिची सिनेमांमध्ये एन्ट्री झाली, आणि आता तिचे हिंदी सिनेमांमध्ये एक मोठे नाव झाले आहे.
चॅनल व्हीवरील 'पॉपस्टार' या मालिकेत ती प्रथम झळकली होती. यात ती अॅंकर नव्हे तर सहभागी स्पर्धकांमध्ये होती. अखेर निवडण्यात आलेल्या आठ स्पर्धकांमध्ये तिचा समावेश होता.

पुढील स्लाईडवर बघा, मंजिरी फडणीसची देखणी छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...