आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manoj Bajpayee And Many More Celebs Attend Screening Of Marathi Film Bandha Naylonche

PIX: \'बंध नायलॉनचे\'च्या स्क्रिनिंगला मनोज बाजपेयीसह पोहोचले सेलेब्स, महेश मांजरेकर गैरहजर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून-  मनोज बाजपेयी, सुबोध भावे, श्रुती मराठे, शोभा खोटे, भावना, बलसार, अमितराज  आणि अभिजीत खांडकेकर - Divya Marathi
डावीकडून- मनोज बाजपेयी, सुबोध भावे, श्रुती मराठे, शोभा खोटे, भावना, बलसार, अमितराज आणि अभिजीत खांडकेकर
सध्याच्या युगात मोबाईल, इंटरनेट,सोशल मिडिया यांचा वापर वाढत चाललेला आहे त्यामुळे आजची पिढी टेक्नोसॅव्ही होत चाललेली आहे. मात्र या वाढत्या टेक्नोसॅव्हीपणामुळे नात्यांमधले रेशमी बंध हळू हळू विरळ होत चालले आहे. माणसाच्या नातेसंबंधात टेक्नॉलॉजीचा वाढता प्रभाव यावर भाष्य करणारा 'बंध नायलॉनचे' हा सिनेमा शुक्रवारी थिएटरमध्ये दाखल झाला आहे. महेश मांजरेकर-मेधा मांजरेकर, सुबोध भावे, श्रुती मराठे, सुनील बर्वे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत.
गुरुवारी झाले स्क्रिनिंग
गुरुवारी सेलिब्रिटींसाठी या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग मुंबईत ठेवण्यात आले होते. बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयीची प्रमुख उपस्थिती या स्क्रिनिंगला होती. शिवाय शोभा खोटे आणि त्यांची लेक भावना बलसारसुद्धा स्क्रिनिंगला हजर होत्या. सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारे सुबोध भावे, सुनील बर्वे आणि श्रुती मराठे स्क्रिनिंगला आवर्जुन हजर होते. अभिनेता सौरभ गोखले, संगीतकार अमितराज, अभिनजीत खांडकेकर, जयवंत वाडकर, दिप्ती श्रीकांत, हेमांगी कवी हे सेलेब्सही यावेळी दिसले.
महेश मांजरेकर गैरहजर
या सिनेमात अभिनेते महेश मांजरेकर आणि त्यांच्या पत्नी मेधा मांजरेकर यांनी प्रमुख भूमिका वठवल्या आहेत. पहिल्यांदाच या दोघांनी एखाद्या सिनेमात एकत्र अभिनय केलाय. स्क्रिनिंगला मात्र या दोघांचीही उपस्थिती दिसली नाही.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सची खास छायाचित्रे...