आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: मानसीच्या या अदा पाहिल्यानंतर कोणीही म्हणणारच.. बाई वाड्यावर या!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी इंडस्ट्रीतील हॉट तारका अर्थातच मानसी नाईक ही अभिनयासोबतच उत्कृष्ट डान्सिंगसाठी ओळखली जाते. स्टेज शोज, सिनेमांमध्ये मानसीचे बहारदार नृत्य बघायला मिळतं. आता हेच बघा ना, गेल्यावर्षी रिलीज झालेला 'जलसा' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. मात्र या सिनेमातील मानसी नाईकवर चित्रीत झालेले 'बाई वाड्यावर या' हे गाणे तुफान गाजले. या गाण्यातील मानसीची प्रत्येक अदा ही बघणा-याला घायाळ करणारी होती. या सिनेमाची मुळीच चर्चा ही फक्त मानसीच्या या गाण्यासाठी झाली.  

मानसी नाईकने तिच्या डान्स स्टाइलच्या जोरावर गेल्या काही वर्षांमध्ये मराठी सिनेसृष्टीमध्ये मोठे नाव मिळवले आहे. गाण्यांमधल्या तिच्या अदांवर घायाळ होणारे लाखो चाहते आहेत. अनेक सिनेमांमध्ये तिचे आयटम साँगही पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी आलेल्या बाई वाड्यावर या.. असे बोल असलेल्या गाण्यात आनंद शिंदे यांचा खास आवाज आणि गाण्यातील मानसीच्या अदा अशी जुगलबंदी पाहायला मिळाली. 

आज (3 फेब्रुवारी) मानसीच्या वाढदिवसाचे औचित्य साधत 'बाई वाड्यावर या...' या गाजलेल्या गाण्यातील तिच्या हॉट अदा दाखवणारी ही खास छायाचित्रे आम्ही फॅन्ससाठी घेऊन आलो आहोत. पुढील स्लाईड्सवर बघा, मानसीच्या दिलखेचक अदा...  
बातम्या आणखी आहेत...