आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री अपुर्वा झाली मिसेस रोहन देशपांडे, पाहा तिचा Wedding Album

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर आणि रोहन देशपांडे यांच्या लग्नातील छायाचित्रे)

झी मराठी वाहिनीवरील 'आभास हा' या मालिकेद्वारे घराघरांत पोहचलेली अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर गुरुवारी तिचा मित्र रोहन देशपांडेसोबत लग्नगाठीत अडकली. पारंपरिक पद्धतीने मुंबईत दोघांचा लग्नसोहळा पार पडला.
रोहन युवासेनेचा पदाधिकारी असून गेल्या आठ वर्षांपासून अपूर्वा त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. गेल्यावर्षी 10 डिसेंबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्कस्थित हॉटेल स्टेटसमध्ये या दोघांच्या साखरपुड्याचा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला होता.
'आभास हा' या मालिकेनंतर अपुर्वा 'आराधना' या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत झळकली होती. अपुर्वापूर्वी अलीकडेचअभिनेता पुष्कर जोग, स्पृहा जोशी, रिमा लागू यांची कन्या मृण्मयी लागू हे सेलिब्रिटी लग्नगाठीत अडकले.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अपुर्वा आणि रोहन यांच्या लग्नाची खास छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा या दोघांच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण...