आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Actor Aadesh Bandekar \'s 50th Birthday Special

आदेश बांदेकर @50: पळून जाऊन केले होते सुचित्रासोबत लग्न, जाणून घ्या रिअल लव्हस्टोरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः महाराष्ट्रातील तमाम वहिनींचे लाडके आदेश भावोजी अर्थातच अभिनेते आदेश बांदेकर यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 50 वर्षे पूर्ण केली आहेत. 18 जानेवारी 1966 रोजी जन्मलेले आदेश मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहेत. टीव्ही मालिका-सिनेमांमध्ये अभिनय करण्यासोबतच ते उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध आहेत. होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते संपूर्ण महाराष्ट्रात भावोजी म्हणून प्रसिद्ध आहेत.
आज आदेश यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्यांच्या रिअल लव्हस्टोरीविषयी सांगत आहोत. आदेश यांच्या पत्नीला संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. प्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा बांदेकर या आदेश यांच्या पत्नी. 25 वर्षांपासून हे दोघे सुखी वैवाहिक आयुष्य व्यतित करत आहेत. त्यांना सोहम नावाचा एक मुलगा आहे.
पळून जाऊन केले होते लग्न
आदेश आणि सुचित्रा बांदेकर मराठी इंडस्ट्रीतील नावाजलेले कपल. महाराष्ट्रातील तमाम वहिनींच्या लाडक्या भावोजींची लग्नगाठ कशी बांधली गेली, याचीही एक रंजक गोष्ट आहे. आदेश आणि सुचित्रा यांनी चक्क पळून जाऊन लग्न केले होते. सुचित्रा यांच्या घरी प्रेमप्रकरण पसंत नव्हते. याचे मुख्य कारण म्हणजे त्यावेळी आदेश यांचे इंडस्ट्रीत स्ट्रगल सुरु होते. त्यामुळे सुचित्रा यांनी आपल्या घरी आदेशविषयी काहीच सांगितले नाही. या दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. क्लासच्या निमित्ताने सुचित्रा घराबाहेर पडल्या आणि आदेश यांना बांद्रा कोर्टात भेटल्या. तिथे दोघांनी लग्न केले आणि नंतर घरी कळवले. त्यांच्या लग्नाला निव्वळ 50 रुपये खर्च आला होता. प्रेक्षकांच्या या लाडक्या कपलने गेल्यावर्षी 14 नोव्हेंबर रोजी आपल्या लग्नाची 25 वर्षे पूर्ण केली आहेत.
व्हिडिओत सांगितला प्रेमाचा किस्सा...
‘झी मराठी’वर लवकरच सुरु होणाऱ्या ‘पसंत आहे मुलगी’ या कार्यक्रमाच्या प्रमोशन निमित्ताने अलीकडेच आदेश-सुचित्रा यांनी एक व्हिडिओ शूट केला आहे. या व्हिडिओत दोघांनाही आपल्या शाळा-कॉलेजवयीन दिवस आठवले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, झी मराठीच्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आलेला आदेश-सुचित्रा यांचा प्रेमाची कबुली देतानाचा खास व्हिडिओ आणि सोबतच छायाचित्रांमध्ये पाहा दोघांचे खास क्षण...