आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हा मराठी हँडसम अभिनेताही चढणार बोहल्यावर, भावी पत्नीसाठी असा दिला Romantic Message

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'रेगे' फेम अभिनेता आरोह वेलणकरही आता बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. आरोहने त्याच्या फेसबुक पेजवर त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबतचा त्याचा एक रोमँटीक फोटो शेअर केला आहे.  या फोटोत आरोहने त्याच्या भावी पत्नीबद्दल सांगत एक रोमँटीक पोस्ट शेअर केली आहे. आता या पोस्टमुळे आरोहच्या फिमेल फॅन्सचे हृदय मात्र नक्की दुखावले गेले असणार यात शंकाच नाही. डान्सर आहे आरोहची होणारी पत्नी...

 

आरोहच्या होणाऱ्या पत्नीचे नाव अंकिता शिंगवी असे आहे. पुण्यात असताना दोघे एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. तेव्हापासून आरोह आणि तिची खास मैत्री. आता अखेर त्यांच्या या नात्याला त्यांनी पुढच्या टप्प्यावर नेण्याचे ठरवले आहे. आरोहने लिहीले आहे की, We met today many years ago, our relationship has been such a rollercoaster throughout. There is so much to express but ill just say this Thank you for being there Ankita Shingvi and i am so happy that i will get an entire life with you. 

 

आरोहने त्याच्या होणाऱ्या पत्नीविषयी भावना व्यक्त करत तिने आतापर्यंत दिलेल्या साथीबद्दल तिचे आभारही मानले आहेत. येत्या 11 डिसेंबरला हा विवाहसोहळा महाबळेस्वर येथे पार पडणार आहे. या विवाहाचे वैशिष्टय म्हणजे विवाहासंबंधी सर्व नियोजन स्मार्ट अॅप पद्धतीने होणार आहे. आरोहने ‘आरोह वेड्स अंकिता’हे एक अॅप लाँच केले असून त्याच्या लग्नाबद्दल सर्व माहिती या अॅपद्वारे पाहुण्यांना कळणार आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये आता आरोहच्या लग्नाची उत्सुक्ता लागलेली आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा आरोहची भावी पत्नी अंकिताचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...