आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरत जाधवचे स्वप्न उतरले सत्यात, खरेदी केली कोट्यवधीची आलिशान कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा मराठमोळा अभिनेता भरत जाधवने नुकतीच मर्सिडीज एस क्लास ही नवी कोरी आलिशान कार खरेदी केली आहे. भरतने फेसबुक आणि ट्विटरवर त्याच्या कारचा फोटो पोस्ट केला आहे.
कारचा फोटो पोस्ट करताना भरतने लिहिले आहे की, ''बऱ्याच दिवसापासून मनात होतं, काल सत्यात अवतरलं. आपली नवी मर्सिडीज एस क्लास..!!''

मर्सिडीज बेन्झ एस क्लास या कारची किंमत 1.16 कोटींपासून सुरुवात होते. विशेष म्हणजे मराठी सिनेसृष्टीत स्वत:ची व्हॅनिटी व्हॅन घेण्याचा मानही भरत जाधवच्या नावावर जमा आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, भरत जाधवच्या आलिशान कारची खास झलक...
बातम्या आणखी आहेत...