आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, भरत जाधवचे बॉलिवूडमध्ये लवकरच कमबॅक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेता भरत जाधव)
चांगल्या भूमिकेसाठी थांबल्याचा मला फायदाच झालाय. आता प्रख्यात दिग्दर्शक कुंदन शाह यांच्या 'पी से पीएमतक' या हिंदी चित्रपटात एका दमदार भूमिकेतून मी हिंदी प्रेक्षकांपुढे जातोय. त्याशिवाय भरत जाधव एन्टरटेन्मेंट या माझ्या कंपनीच्या माध्यमातून भविष्यात मराठी, हिंदी चित्रपट निर्मितीतही उतरणार असल्याचे भरत जाधव याने 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.
भरत हिंदी चित्रपटसृष्टी कधी गाजवणार ? या प्रश्नावर बोलताना भरतने सविस्तरपणे त्याची भूमिका मांडली.
'मी मागेपण म्हटले होते, की हिंदी चित्रपटात फुटकळ रोल मी कधीच करणार नाही. मराठी चित्रपटांच्या स्टारने हिंदीत जाऊन बाष्कळ बडबड करणारा हीरोचा मित्र, घरगडी किंवा तत्सम भूमिका करणे मला कधीच पटणारे नाही. त्यापेक्षा मराठी नाटकात आणि चित्रपटातच मी आनंदी रहायचे ठरवले होते. पण नुकताच एक रोल आला आणि तो पण कुणाकडून? कुंदन शहांकडून. ज्यांनी 'जाने भी दो यारो'सारखा माइलस्टोन चित्रपट बनवलाय. 'कभी हा कभी ना', 'क्या कहेना'सारखे वेगळे चित्रपट आणि 'नुक्कड', 'वागले की दुनिया'सारख्या मालिका बनवल्या, त्या कुंदनजींनी माझ्याकडे एका भूमिकेसाठी विचारणा केली. एका मोठ्या पक्षाचा मुख्य पुढारी असा तो रोल वाचल्यानंतर मला आवडला. तरीसुद्धा मी कुंदनजींना विचारून घेतले की, स्क्रीप्टमध्ये जितकी भूमिका आहे, तेवढीच चित्रपटात दिसेल ना? चित्रपटात दोन- तीन सीनमध्येच भूमिका कापली जाणार असेल तर मी ती भूमिका करणार नाही सांगितले. मात्र, त्यांनी जेव्हा शब्द दिला, तेव्हाच मी त्याला तयार झालो, आणि भविष्यातही मी हिंदीत चांगले रोल असेल तरच काम करेल असेही भरतने सांगितले.
आणखी काय म्हणाला भरत, जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...