आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: भूषणच्या आईने स्वतः साकारली बाप्पाची मूर्ती, साजरा केला इको फ्रेंडली गणेशोत्सव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी इंडस्ट्रीतील हॅण्डसम हंक म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता भूषण प्रधानने मागील वर्षीप्रमाणे यंदाही इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा केला. गेल्यावर्षी भूषणच्या आई सीमा प्रधान यांनी शाडूच्या मातीपासून स्वतः बाप्पाची मुर्ती तयार केली होती. यंदासुद्धा त्यांनी स्वतः बाप्पा साकारला. भूषणेच नवीन घरातील गणेशोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे.  
 
दीड दिवस भूषणच्या घरी बाप्पा विराजमान होते. या दीड दिवसांत भूषणचे फॅमिली, फ्रेंड्स बाप्पाच्या दर्शनाला त्याच्या घरी आले होते. मराठी इंडस्ट्रीतील वैभव तत्त्ववादी, पूजा सावंत या कलाकारांनी भूषणच्या बाप्पाचे दर्शन घेतले. गणरायासाठी खास फुलांची आरास करण्यात आली होती. दीड दिवस मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर मंगळवारी ईको फ्रेंडली पद्धतीने भूषणने आपल्या बाप्पाला निरोप दिला. घरीच बाप्पाची मुर्ती विसर्जित करण्यात आली.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन तुम्हीही बघा, भूषणच्या घरी झालेल्या गणपती सेलिब्रेशनची खास छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...