आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Celebrity Ganesha: भूषणच्या आईने हाताने साकारली बाप्पाची मुर्ती, ईको फ्रेंडली पद्धतीने केले विसर्जन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः
मराठी इंडस्ट्रीतील हॅण्डसम हंक म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता भूषण प्रधानसाठी यंदाचा गणेशोत्सव अतिशय खास ठरला आहे. यंदाच्या वर्षी भूषणच्या नवीन घरात बाप्पाचे आगमन झाले. विशेष म्हणजे पहिल्यांदाच भूषणच्या आई सीमा प्रधान यांनी शाडूच्या मातीपासून स्वतः बाप्पाची मुर्ती तयार केली होती.
दीड दिवस भूषणच्या घरी बाप्पा विराजमान होते. या दीड दिवसांत भूषणचे फॅमिली, फ्रेंड्स बाप्पाच्या दर्शनाला त्याच्या घरी आले होते. मराठी इंडस्ट्रीतील वैभव तत्त्ववादी, पूजा सावंत, संस्कृती बालगुडे या कलाकारांनी भूषणच्या बाप्पाचे दर्शन घेतले. गणरायासाठी खास फुलांची आरास करण्यात आली होती.

दीड दिवस मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर मंगळवारी ईको फ्रेंडली पद्धतीने भूषणने आपल्या बाप्पाला निरोप दिला. घरीच बाप्पाची मुर्ती विसर्जित करण्यात आली.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन तुम्हीही बघा, भूषणच्या घरी झालेल्या गणपती सेलिब्रेशनची खास छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...