आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसिद्ध अभिनेते डॉ. विलास उजवणे यांना ब्रेन स्ट्रोक, ज्युपिटर हॉस्पिटलच्या आयसीयूत दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते डॉ. विलास उजवणे यांना ब्रेन स्ट्रोकमुळे ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु असून रक्तदाब कंट्रोल करण्याचे डॉक्टरकडून प्रयत्न सुरु आहेत. 

सुमारे शंभर मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय करणाऱ्या डॉ. उजवणे यांनी नाट्यक्षेत्र तसेच दूरचित्रवाणी मालिकांमध्येही अभिनयाने रसिकांची वाहवा मिळविली आहे. अलीकडेच ते ब्रेव्हहार्ट या चित्रपटात झळकले होते. डॉ. उजवणे यांच्या पत्नीचे नाव अंजली उजवणे असून त्यादेखील मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.
  
बातम्या आणखी आहेत...