आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेवर आगपाखड करणारा हा आहे शिवसेनेचा \'स्टार\' चेहरा, शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी आहे फेमस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः मराठी रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले नाव म्हणजे डॉ. अमोल कोल्हे. रंगभूमीवर 'जाणता राजा' या नाटकात त्यांनी साकारलेली शिवाजी महाराजांची भूमिका प्रचंड गाजली. याशिवाय छोट्या पडद्यावरदेखील राजा शिवछत्रपती या मालिकेत ते याच भूमिकेत झळकले होते. अमोल कोल्हे यांना विशेषतः ऐतिहासिक भूमिकेतच प्रेक्षकांनी अधिक पाहिले आहे. शिवाजी महाराजांसोबतच त्यांनी संभाजी राजेसुद्धा साकारले आहेत.  ‘शंभूराजे’  या नाटकांत ते संभाजी महाराजांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले. या नाटकाचे त्यांनी 520 प्रयोग केले होते. या नाटकामुळेच मला ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेत शिवाजी महाराजांची भूमिका मिळाली, असे अमोल यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. 
 
आज आहे वाढदिवस...
मराठी इंडस्ट्रीतील या प्रसिद्ध अभिनेत्याचा आज वाढदिवस आहे. 18 सप्टेंबर 1980 रोजी पुण्यानजीकच्या नारायणगाव येथे अमोल यांचा जन्म झाला. त्यांचे संपूर्ण नाव डॉ. अमोल रामसिंग कोल्हे असे आहे. 
 
पुढे वाचा, दहावी आणि बारावीत आले होते गुणवत्ता यादीत... 
बातम्या आणखी आहेत...