आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्षाबंधन 2017 : यंदा गश्मीर रक्षाबंधनाला सोबत नाही, तरी बहीण म्हणतेय ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही!’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थोरली बहीण रश्मी महाजनी-वैद्यसोबत गश्मीर महाजनी - Divya Marathi
थोरली बहीण रश्मी महाजनी-वैद्यसोबत गश्मीर महाजनी
 
अभिनेता गश्मीर महाजनी सध्या खूप बिझी आहे. त्याचा आगामी ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी रिलीज होतेय. त्यामूळे तो वेगवेगळ्या शहरात जाऊन फिल्मचं प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. म्हणूनच यंदा रक्षाबंधनाला तो त्याच्या मोठ्या बहिणीसोबत रक्षाबंधन साजरं करू शकणार नाही.  रक्षाबंधन 2017 : दोन भावांची लाडकी बहीण आहे सोनाली कुलकर्णी, सांगतेय कसे असते सेलिब्रेशन
 
गश्मीरला त्याच्या मोठ्या बहिणीविषयी विचारल्यावर तो म्हणतो, “माझी ताई माझ्यापेक्षा तेरा वर्षांनी मोठी आहे. त्यामुळे ती माझी दूसरी आई आहे, असं म्हटलं तरी चालेल. मी तान्हा असल्यापासून तिने मला सांभळलंय. माझं प्रत्येक गुपित ताईसोबत शेअर होतं. माझी ताई माझ्यासाठी फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड आहे, असंच म्हणा ना.”
 
गश्मीर पुढे सांगतो, “माझी मोठी बहीण रश्मी महाजनी-वैद्य तिच्या लग्नानंतर बेळगावला राहते. त्यामुळे माझं फिल्मी करियर चालू झाल्यापासून दरवर्षी आम्हांला एकत्र रक्षाबंधन साजरं करता येतंच, असं नाही. पण मी जगात कुठेही असलो, तरीही मला माझ्या पत्त्यावर एक दिवस आधीच राखी पोहोचते. एका वर्षी मी मध्यप्रदेशात शुटिंग करत होतो. शूटिंग मध्यप्रदेशातल्या खूपच आतल्या भागात होतं. तो पत्ता शोधणं कठीण असतानाही तिची राखी एक दिवस आधी पोहोचली. यंदाही हा नियम चुकणार नाही, ह्याची मला खात्री आहे.”  
 
गश्मीरकडे राखी पोहोचल्यावर ती रक्षाबंधनाच्या दिवशी हाताला बांधून त्याचा फोटो बहिणीला पाठवणं फक्त बंधनकारक असतं. त्यामुळे यंदाही गश्मीर रक्षाबंधनाला हाताला राखी बांधून ताईला सेल्फी पाठवणार आहे.
 
पुढे बघा, थोरल्या बहिणीसोबतचा गश्मीरचा बालपणीचा खास फोटो...
बातम्या आणखी आहेत...