आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी साकारलेला शाहिर घडवला तो दिग्दर्शक एन. रेळेकर यांनीच, सांगतोय हर्ष कुलकर्णी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आगामी चित्रपट 'छंद प्रीतीचा' या चित्रपटातून एक नवखा कलाकार हर्ष कुलकर्णी आपल्यासमोर येत आहे. चित्रपटात शाहिराची भूमिका साकारणाऱ्या हर्षने चित्रपटाबद्दल आणि त्याच्याबद्दल काही खास गोष्टी आमच्यासोबत शेअर केल्या. तर पाहा काय म्हणतोय हर्ष कुलकर्णी त्याच्या आगामी चित्रपटाविषयी..
 
छंद प्रीतीचा या चित्रपटापर्यंत कसा पोहोचलास?
एका वेगळ्या प्रोजेक्टसाठी मी गेलो होतो तेव्हा मी 'छंद प्रीतीचा'ची कथा ऐकली. खास मराठी मातीतली ही स्क्रिप्ट माझ्या मनाला फार भावली. काही जवळच्या लोकांनी मला हा चित्रपट करु नको असाही सल्ला दिला पण माझ्यातील कलाकाराने मला ही चित्रपट नाकारु नये असा कौल दिला आणि मी हा चित्रपट साकारला. या चित्रपटात अभिनयाला खूप भाव होता. शाहिराचे कॅरेक्टर काय आहे हे कधीही माहिती नव्हते. पण हळूहळू काम करत गेलो आणि या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. संगीत हा या चित्रपटाचा आत्मा आहे. चित्रपटात एक रोमँटीक गाणे असावे अशी माझी इच्छा दिग्दर्शकांनी पूर्ण केली. 
 
चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण दाखवण्यात आला आहे? नेमकी तुझी चित्रपटात भूमिका काय आहे?
या चित्रपटात मी एका शाहिराची भूमिका केली आहे. चित्रपटात माझ्यासमोर मोठेमोठे कलाकार होते. जसाजसा एकेक सीन करत गेलो याबद्दल मनातील दडपण निघत गेले. चित्रपटात मी एक लव्हर बॉय साकारला आहे. 
 
शूटिंगवेळी सुवर्णा काळे आणि तुझी केमिस्ट्री कशी होती ?
-माझी आणि सुवर्णाची केमिस्ट्री एकदम चांगली होती. अनेक चित्रपट करुनही जेवढी चांगली केमिस्ट्री होत नाही तितकी चांगली केमिस्ट्री आम्ही या चित्रपटानिमित्त अनुभवली. सुवर्णा आणि मी भेटलो तेव्हापासूनच चांगले मित्र बनलो. लोकांना माझी आणि सुवर्णाची केमिस्ट्री नक्की आवडेल.
 
शाहिराच्या रोलसाठी किती अभ्यास केलास? 
मी या रोलसाठी कोणतेही पुस्तक अथवा वेगळा असा अभ्यास केला नाही. दिग्दर्शक एन. रेळेकर यांनी मला शाहिर नेमका कसा असतो आणि काय करतो हे उत्तमप्रकारे समजावून सांगितले. दीड वर्षे मी त्यांच्या घरी जात असू. याचे पूर्ण श्रेय मी रेळेकर यांनाच देईन. यासाठी खास मी वजनही वाढवले होते. 
बातम्या आणखी आहेत...