आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'खाना' इसिका नाम है...! जितूची खवय्येगिरी; स्वयंपाक ते पोटोबा मुशाफिरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जितेंद्र जोशी नाटक, सिनेमा सूत्रसंचालन आणि कविता या सगळ्यात मुशाफिरी करणारा एक देखणा कलावंत..! सध्या त्यांची निर्मिती असलेलं मिश्री थिएटरचं 'दोन स्पेशल' आणि आसक्त निर्मित 'मैं हूं युसूफ और ये मेरा भाई' ही दोन नाटकं गाजत आहेत. आम्ही एका सिनेमात (एकाच) एकत्र काम केलं होतं! माझा रोल एकदमच छोटा होता.. पण मी म्हटलं आपण भूमिकेची लांबी बघायची नाही. (खोली पहिल्यापासूनच नव्हती!) लंच टाइमला केटरिंगवाल्याने जेवण टेबलावर लावलं. ताट, वाट्या, पेले अस्वच्छ होते. पावडर दिसत होती. जितेंद्रनी सगळ्यांना फैलावर घेतलं. 'या असल्या ताटात जेवायचं आम्ही. इथे कोण, कोण दिग्गज बसलेत माहीत आहे का? हे मोठमोठे लेखक आणि कलावंत आहेत. हयात गेली यांची कलेच्या साधनेत. हे असल्या ताटात जेवणार?' मला एकदम पुलंचे 'रावसाहेब' आठवले. कुणा कलाकाराच्या पायात खिळा जाऊ नये म्हणून भराभर झाडूने स्टेज झाडणारे. कोणीच काहीही बोललं नाही. सगळ्यांच्या माना खाली होत्या. 'हास्यसम्राट'मध्ये असताना जितेंद्र जोशींनी दिवाळीच्या वेळी यावर्षी काय चौकोनी चकली केली का? असं विचारून मला चकलावून टाकलं होतं! अशा या मनस्वी कलावंताशी फोनवर संपर्क केला असता त्यांनी भरभरून बोलायला सुरुवात केली. सकाळी उठल्यावर दिवसाची सुरुवात कशी करता? बऱ्याच वेळा लिंबू मध पाणी घेऊन!
बातम्या आणखी आहेत...