आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'DAY: 'आदित्य'चा चार्ली चॅप्लिन आहे आदर्श, पहिल्याच मालिकेत झाला होता खलनायक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेलं नाव म्हणजे ललित बदाने. या मालिकेत ललितने साकारलेली आदित्यची भूमिका बरीच गाजली. आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेतेय. मात्र या मालिकेमुळे आदित्य अर्थातच अभिनेता ललित तरुणींच्या गळ्यातला ताईत बनला. आज तो आपला 28 वा वाढदिवस साजरा करत आहे. 12 सप्टेंबर 1987 रोजी कल्याण (मुंबई) येथे ललितचा जन्म झाला.

आज ललितच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याविषयी सांगत आहोत...
कॉलेजपासून झाली अभिनयाला सुरुवात...
ललितने बिर्ला कॉलेजमधून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे. त्याची अभिनयाची सुरुवात कॉलेजपासून झाली. बिर्ला कॉलेजला नाटकात काम करणारा ग्रुप होता. तेथे दोन वर्षे ललितने बॅक स्टेज आर्टिस्ट म्हणून काम केले. त्यादरम्यान नाटकात छोट्या-मोठ्या भूमिकासुद्धा साकारल्या. याच काळात त्याला नाटकाची स्कॉलरशिप आणि पदवी मिळाली. हा प्रवास सुरु असताना ई टीव्ही वाहिनीवरील 'गंध फुलांचा गेला सांगून' ही मालिका त्याला मिळाली. ललित अभिनयाबरोबर प्रायोगिक नाटकांचे दिग्दर्शन, सेट डिझायनिंग, लाइट्स देणे यांसारखी कामे करतो.
पहिल्याच मालिकेत मिळाली नकारात्मक भूमिका...
'गंध फुलांचा गेला सांगून' या मालिकेत ललितने आपल्या मुळ स्वभावाच्या उलट नकारात्मक भूमिका साकारली होती. याशिवाय 'जीवलगा' आणि 'आभास' हा या मालिकेत तो छोटेखानी भूमिकेत झळकला होता.
ललित आणि 'जुळून येतील रेशीमगाठी'मधील 'आदित्य' सारखे...
एका मुलाखतीत ललितने सांगितले होते, 'जुळून येतील रेशीमगाठी' या मालिकेतील ‘आदित्य’ या पात्रात आणि त्याच्यात तीळमात्रही फरक नाही. आदित्यची बोलण्याची, स्वत:चे विचार मांडण्याची पद्धतही अगदी माझ्यासारखीच आहे. मालिकेत तो जेवढा समजूतदार, अदबीने बोलणारा दाखवला तसाच तो ख-या आयुष्यातही आहे.
चार्ली चॅप्लिन आहे आदर्श...
आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा चार्ली चॅप्लिन ललितसाठी अभिनयाच्या क्षेत्रात गुरुस्थानी आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा ललितची खासगी छायाचित्रे...
(नोटः ही सर्व छायाचित्रे ललितच्या फेसबुक पेजवरुन घेण्यात आली आहेत.)