आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day : खास कारणामुळे आडनाव लावत नाही ललित, पहिल्याच मालिकेत साकारला होता खलनायक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेलं नाव म्हणजे ललित प्रभाकर. या मालिकेत ललितने साकारलेली आदित्यची भूमिका बरीच गाजली होती. छोट्या पडद्यावर स्वतःची वेगळी छाप उमटवल्यानंतर आता ललित मोठ्या पडद्याकडे वळला आहे.
 
'चि. व चि. सौं. कां.', 'तुझं तू माझं' मी या चित्रपटांमधून ललित आता तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. त्याच्या या दोन्ही चित्रपटांना तिकिटखिडकीवर प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. आता लवकरच ललित 'नटरंग' फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबत मोठ्या पडद्यावर स्क्रिन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. प्रकाश कुंटे दिग्दर्शित अद्याप नाव न ठरलेल्या चित्रपटात हे दोघे झळकणार असून या चित्रपटाचे शूटिंग हंपी येथे झाले आहे. 

आज ललितचा वाढदिवस आहे. 12 सप्टेंबर 1987 रोजी कल्याण (मुंबई) येथे जन्मलेल्या ललितने वयाची तिशी पूर्ण केली आहे. ललितच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जाणून घेऊयात त्याच्याविषयी बरंच काही.. 
 
पुढे वाचा, का आडनाव लावत नाही ललित...
बातम्या आणखी आहेत...