आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दणक्यात झाले मोहन जोशींचे B\'day सेलिब्रेशन, \'गौरी\'च्या \'बाबां\'ना शुभेच्छा द्यायला आले सेलेब्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांनी 12 जुलै रोजी वयाची 65 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका जंगी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत मराठी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
 
अलका कुबल, मधुरा वेलणकर, सायली संजीव, भारत गणेशपुरे, सुनील बर्वे, संजय नार्वेकर, अमृता सुभाष, आनंद इंगळे, सुशांत शेलार, स्मिता जयकर, संदेश कुलकर्णी, कांचन अधिकारी, शरद पोंक्षे, विजय पाटकर, वंदना गुप्ते, ऋषीकेश जोशी, अभिजित चव्हाण, सोनिया परचुरे, जयवंत वाडकर, सुकन्या मोने, तुषार दळवी, अतुल परचुरे, केदार शिंदे, अशोक शिंदे, वैभव मांगले, श्रीरंग गोडबोले, पुष्कर श्रोत्री, ऋषी सक्सेना, शुभांगी गोखले, स्पृहा जोशी, गश्मिर महाजनी, विद्याधर जोशी, मुक्ता बर्वे, विजय गोखले, इला भाटे,  काहे दिया परदेस या मालिकेची संपूर्ण टीम बर्थडे सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली होती. 

मोहन जोशी यांनी मराठी, हिंदीसह भोजपुरी आणि कन्नड चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. सध्या ते 'काहे दिया परदेस' या मालिकेत छोट्या पडद्यावर दिसत आहेत. 

कसे झाले मोहन जोशी यांचे बर्थडे सेलिब्रेशन हे बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर... 
 
बातम्या आणखी आहेत...