आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नानांच्या घरी बाप्पा विराजमान, सिनेसृष्टीत पाय रोवण्यासाठी नानांना करावा लागला 8 वर्षे संघर्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय सिनेसृष्टीत प्रगल्भ अभिनेते म्हणून ओळखले जाणारे नाना पाटेकर हे गणपतीचे निस्‍सीम भक्‍त आहेत. गणेशोत्‍सवाच्‍या अनुषंगाने त्‍यांच्‍या संघर्षशील जीवनाबद्दल खास माहिती...
खासगी आयुष्य...
नाना यांचे खरे नाव विश्वनाथ पाटेकर असे आहे. त्यांचे वडील दिनकर पाटेकर चित्रकार होते. मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथून नानांनी आपले शिक्षण पूर्ण केले. कॉलेज जीवनात त्यांनी रंगभूमीवर काम केले. नानांना स्केचिंगची आवड आहे. गुन्हेगारांची ओळख पटवून देण्यासाठी नाना मुंबई पोलिसांना स्केच बनवून देत असे. नाना यांचे लग्न नीलकांती पाटेकर यांच्यासोबत लग्न झाले. त्यांना एक मुलगा असून मल्हार पाटेकर हे त्याचे नाव आहे. नाना यांचे वैवाहिक आयुष्य फार काळ टिकले नाही. काही वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला.

बॉलिवूडमधील पदार्पणः
नाना पाटेकर यांनी 1978 मध्ये 'गमन' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र या सिनेमामधून ते प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात अपयशी ठरले. सिनेसृष्टीत पाय रोवण्यासाठी नानांना तब्बल आठ वर्षे संघर्ष करावा लागला. याकाळात ते मिळतील ती भूमिका करत असते. याकाळात त्यांनी गिद्ध, भालू, शीला या सिनेमांमध्ये अभिनय केला. यापैकी एकही सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालला नाही.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, या नटीसोबत जोडले गेले होते नानांचे नाव...
बातम्या आणखी आहेत...